Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रग्रामपंचायत नेसरी येथे ग्राम संघांना शेती अवजार बँक प्रदान सोहळा संपन्न. (...

ग्रामपंचायत नेसरी येथे ग्राम संघांना शेती अवजार बँक प्रदान सोहळा संपन्न. ( उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती गडहिंग्लज.)🟣श्री भावेश्वरी विकास सेवा संस्था सुलगांवच्या चेअरमन पदी वसंत देसाई तर व्हा. चेअरमन पदी सागर कसलकर बिनविरोध.

🟣ग्रामपंचायत नेसरी येथे ग्राम संघांना शेती अवजार बँक प्रदान सोहळा संपन्न. ( उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती गडहिंग्लज.)
🟣श्री भावेश्वरी विकास सेवा संस्था सुलगांवच्या चेअरमन पदी वसंत देसाई तर व्हा. चेअरमन पदी सागर कसलकर बिनविरोध.

🛑ग्रामपंचायत नेसरी येथे ग्राम संघांना शेती अवजार बँक प्रदान सोहळा संपन्न. ( उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती गडहिंग्लज.)

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

Oplus_131072

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती गडहिंग्लज, अंतर्गत शिवकन्या महिला प्रभाग संघ नेसरी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांच्यामार्फत आज दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत नेसरी येथे ग्राम संघांना शेती अवजार बँक प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी उपस्थित चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आम. शिवाजीराव पाटील यांचे प्रतिनिधी भारतीताई, पंचायत समिती गडहिंग्लज गटविकास अधिकारीसो संतोष नागटिळक साहेब, तालुका उपविभागीय कृषी अधिकारी मा. किरण पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी भोपाल कांबळे, सुमेश जजरवार, नेसरी पोलीस स्टेशनचे एपीआय,नेसरी गावच्या लोकनियुक्त सरपंच गिरजा देवी शिंदे नेसरीकर, नेसरी उपसरपंच, जिल्हा अभियान व्यवस्थापक मा. दयानंद पाटील , MIS ऋत्विक आपटे, तालुका अभियान व्यवस्थापक मा. प्राजक्ता सावंत, प्रभाग संघ पदाधिकारी ग्राम संघ पदाधिकारी, बँक ऑफ इंडिया व HDFC बँक शाखाधिकारी,नेसरी प्रभागातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, यांच्या उपस्थितीत राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ शिपुर तर्फ नेसरी, प्रेरणा महिला ग्रामसंघ हेबाळ जल, त्रिवेणी महिला ग्रामसंघ बुगडीकट्टी, घटप्रभा महिला ग्रामसंघ सरोळी या ग्राम संघांना औजार बँकेची चावी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली त्याच त्याचबरोबर बँकेकडून गटांना मिळालेले बँक कर्ज रुपये ३४ लाख व वैयक्तिक कर्ज गटातील महिलांना, लखपती दीदी प्रमाणपत्र, विमा इन्शुरन्स याचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. सचिव रंजना पाटील,सुषमा बामणे,लावण्या नाईक, अनिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व मान्यवर यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले उमेद अभियानामुळे महिला सक्षम होत आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती होत आहे. सर्व महिलांनी उमेद अभियाना मधून आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधता येते आज या ठिकाणी आपण दाखवून दिलेले आहे. आपल्या पुढील सर्व कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रम साठी तालुका व्यवस्थापक राहुल ठाणेकर, अनिल यादव,प्रभाग समन्वयक, कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक, प्रभाग संघ व्यवस्थापक, प्रभाग संघ लिपिका, गडहिंग्लज तालुक्यातील सर्व सीआरपी, कृषी सखी, पशु सखी, बँक सखी, बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या.

🟣श्री भावेश्वरी विकास सेवा संस्था सुलगांवच्या चेअरमन पदी वसंत देसाई तर व्हा. चेअरमन पदी सागर कसलकर बिनविरोध.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

सुलगाव येथील भावेश्वरी विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या संस्थेत आजरा साखर कारखाना व जनता बँकेचे संचालक रणजीत देसाई यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बिनविरोध निवडणूक पार पडली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत माजी सरपंच वसंत देसाई यांची चेअरमन पदी व माजी ग्रामपंचायत सदस्य सागर गुंडू कसलकर यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन व व्हा. चेअरमन पदांची नांवे गणपतराव कुंभार व दिनकर देसाई यांनी सुचविली त्यास संजय गुरव, महेश कांबळे यांनी अनुमोदन दिले.

या विकास संस्थेची सन २०११मध्ये स्थापना होवून सुलगांव सारख्या अल्प जमीन क्षेत्र असलेल्या छोट्याशा गावात संस्था सहकारी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करीत उत्तम प्रकारे सुरू आहे. संस्थेची स्थापनेपासून दरवर्षी १०० टक्के कर्ज वसुली होत असून सतत आॅडीट वर्ग 'अ' प्राप्त झाला आहे. यापुढेही संस्थेचा कारभार पारदर्शी व सभासदांच्या हीताचाच करणार असलेची ग्वाही नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी दिली.  प्रमोद फडणीस, सहायक निबंधक श्रेणी -२ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
   यावेळी माजी अध्यक्ष रणजीत देसाई, सरपंच पांडुरंग खवरे, उपसरपंच  सदानंद कदम, सदस्य  प्रल्हाद देसाई, माजी सदस्य रविंद्र कदम,संस्थेचे  संचालक बबन देसाई,  दशरथ लांडे,  अनिल  देसाई, संचालिका श्रीमती विमल डोंगरे, सौ. शितल देसाई,  संजय डोंगरे,  आनंदा डोंगरे,  सौरभ कसलकर तसेच सेक्रेटरी  बसवराज उत्तुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.