कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई हायकोर्ट चे खंडपीठ मंजूर झाल्याबद्दल.- आजरा बार असोसिएशनचा सत्कार.
आजरा.- प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यामधे मुंबई हायकोर्ट चे खंडपीठ मंजूर झाल्याबद्दल, आजरा कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य वकील यांचे अभिनंदन मराठा महासंघ व आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांच्याकडून करण्यात आले यावेळी मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष मारुती मोरे व आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी अध्यक्ष ऍड शैलेश देशपांडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड शैलेश देशपांडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ आल्यामुळे त्याचे भविष्यात किती फायदे आहेत याची माहिती दिली.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.मोरे आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष श्री बामणे, ऍड देवदास आजगेकर, ऍड धनंजय देसाई, ऍड जी जे पाटील, ऍड सचिन इंजल, ऍड आर आर चव्हाण, ऍड आश्लेष अजगेकर, ऍड एल पी पाटील, ऍड परीट, बंडोपंत चव्हाण, सी आर देसाई, संभाजी इंजल, वाय बी चव्हाण, शिवाजीराव पाटील, ज्योतिबा आजगेकर, शंकरराव शिंदे, सूर्यकांत आजगेकर, मेजर मोहिते, शिवाजीराव गुडूळकर, शि डी सरदेसाई, निलेश चव्हाण, आण्णा डोंगरे, इत्यादी मंडळी, ऍड धनंजय देसाई यांनी आभार मानले.