🛑मराठा / कुणबी समाजाच्या शैक्षणिक व विविध अडचणीसाठी – उपसमिती नेमावी.- मराठा महासंघाचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाने मागणी.
🛑युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजरा – ता. अध्यक्ष पदी संजय येजरे यांची निवड.
🛑मराठा / कुणबी समाजाच्या शैक्षणिक व विविध अडचणीसाठी – उपसमिती नेमावी.- मराठा महासंघाचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाने मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
मराठा, कुणबी, कुणबी – मराठा, या समूहाचे आरक्षण, शैक्षणिक प्रवेश, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, कर्ज व्याज परतावा अनुदानात होणारा विलंब, वेळेत निर्वाह भत्ता न मिळणे, जात प्रमाणपत्र व पडताळणी मधील विलंब, नॉन क्रिमीलेअर इ. विविध प्रकारचे दाखले इ. संदर्भाने सोडवणूकीसाठी मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्याबाबत. मा. सर्वोच्च न्यायालयाने SEBC (मराठा) आरक्षण अधिनियम २०२४ संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावनी घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयास निर्देश दिलेले आहेत. SEBC (मराठा) आरक्षणास अनेक याचिकाकर्त्यांनी विरोधी याचिका दाखल केलेल्या आहेत. याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले आहे. पुढे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हि सुनावनी दि. १८/०७/२०२५ पासून सुरू झालेली आहे. व दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पुर्ण दिवस अशी सुनावनी होणार आहे. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागसलेपण हे विरोधी याचिकाकत्यांनी आव्हानित केलेले असून सन २०२४ चा अधिनियमास आव्हानित केलेले आहे याबाबत शासन स्तरावरून सदर याचिकेचे सुनावनी बाबत समन्वय ठेवण्यासाठी व याबाबत ज्याकाही अडचणी, आढावा, समस्या, डाटा संकलन, माहिती आवश्यक असते त्यासाठी शासन स्तरावर मंत्रीमंडळ उपसमिती याचा समन्वय करत असते.
आपल्या मागील सरकारच्या काळात मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती नेमली होती, नंतरच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात देखील उपसमिती स्थापन केलेली होती. सद्याचे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रीमंडळ उपसमिती नेमली नसल्याने आता सदर केसकडे कोणाचेही गांभीर्याने लक्ष नाही. हि अत्यंत खेदाची बाब आहे.
सामान्य प्रशासन विभागातील एक अधिकारी फक्त उच्च न्यायालयात हजर राहत आहेत. शैक्षणिक प्रवेश, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज व्याज परतावा होणारा विलंब, वेळेत निर्वाह भत्ता न मिळणे, जात प्रमाणपत्र व पडताळणी मधील विलंब, नॉन क्रिमीलेअर इ. विविध प्रकारचे दाखले अश्या अनेक छोटया मोठ्या विषयासाठी देखील विविध खात्यांकडे पाठपुरावा करावा लागतो. कोणताही विषयाची सुरुवात त्या खात्याचे मंत्री महोदय यांचे निर्देश सचिव सहसचिव उपसचिव कक्ष अधिकारी विभाग येवून होत. व त्याचप्रमाणे त्या खात्याचे मंत्री महोदय यांचे निर्देश सचिव सहसचिव उपसचिव कक्ष अधिकारी विभाग येथून होत. व त्याचप्रमाणे उलट कक्ष अधिकारी ते मंत्री महोदय व अंतिम दोन उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री इथपर्यंत असते. परिपत्रक, शासन निर्णय काढून घेण्यासाठी एवढा पाठपुरावा करावा लागतो. याशिवाय राज्यामधील विधीमंडळ सदस्य, जिल्हाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी यांनाही निवेदने द्यावी लागतात. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व विषय हाताळणारी मंत्रीमंडळ उपसमिती तातडीने नेमावी असे दिलेल्या निवेदनात मध्ये आहे.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, सह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
🛑युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजरा – ता. अध्यक्ष पदी संजय येजरे यांची निवड.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट.) अध्यक्षपदी हालेवाडी येथील संजय येजरे यांची निवड करण्यात आली आहे. श्री येजरे हे मागील अनेक वर्षापासून नाम. हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक आहेत. राजकीय व सामाजिक कार्यात उत्तुर विभागात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
या निवडीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, दीपक देसाई, शिरीष देसाई, संभाजी तांबेकर अल्बर्ट डिसोझा, एम. के. देसाई यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या निवडीमुळे उत्तुर पंचक्रोशी सह तालुक्यात कौतुक होत आहे.