Homeकोंकण - ठाणेमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर.- काय आहेत राजकीय घडामोडी.🛑लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या...

मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर.- काय आहेत राजकीय घडामोडी.🛑लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर दरड कोसळली.- दोन जवान शहीद🛑चिपळूणात डाँक्टरच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या.- चिपळूणात उडाली खळबळ…

🛑मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर.- काय आहेत राजकीय घडामोडी.
🛑लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर दरड कोसळली.- दोन जवान शहीद
🛑चिपळूणात डाँक्टरच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या.- चिपळूणात उडाली खळबळ…

🟥मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला.-
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे दिल्लीत.- महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरु?

मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरु आहेत. या घडामोडी आता कुठपर्यंत जातील? हे पाहणं महत्त्वाचं आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याची चाहूल या निमित्ताने लागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीला जाण्याचा टायमिंग फार महत्त्वाचा आहे. एकीकडे एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांसोबत विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती आहे. या दोन्ही घडामोडींच्या टायिंगवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात काही घडामोडी घडणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या खासदारांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्यासोबतच सर्व राज्यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसोबत शिवसेना चर्चा करणार आहेत. एकनाथ शिंदे आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान वकिलांसोबत देखील चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी काळात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी होणार आहे.याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे वकिलांसोबत चर्चा करणार असल्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात आगामी काळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नुकतेच दिल्ली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवायचं आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. पण अद्याप तरी तशा काही घडामोडी घडलेल्या नाहीत. आगामी काळात अशा घडामोडी घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी सुरु आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीसाठी मोठं चॅलेंज असणार आहे. तसचे निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे. असं असलं तरी सध्या महायुतीत अंतर्गत खटके उडत असल्याचीदेखील चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवल्याची चर्चा आहे. तसेच फडणवीसांच्या नगरविकास खात्यातून मंजूर होणारा निधी अंतिम स्वाक्षरीसाठी आपल्याकडे येईल, असा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

🛑लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर दरड कोसळली.- दोन जवान शहीद

लेह :- वृत्तसंस्था

लडाखमध्ये मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरडीखाली आले आणि दुर्घटना घडली. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे.

लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ३० जुलैला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास लडाखच्या खोऱ्यांत ही घटना घडली आहे. एक मोठी दरड कड्यावरुन खाली कोसळली आणि लष्कराच्या ताफ्यातील एका वाहनावर आदळली. वाहनातील दोन जवानांना आपला प्राण गमवावा लागला आहे. शहीद जवानांची ओळख लेफ्टनंट कर्नल भानू प्रकाप सिंग आणि लान्स दफादार दलजीत सिंग अशी झाली आहे. या प्रदेशात कार्यरत असलेल्या एका युनिटमध्ये ते काम करत होते. अपघातात त्यांनी गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे.

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने एक्स हँडलवर पोस्ट केली आहे की, ३० जुलै २०२५ ला सकाळी ११.३० वाजता लडाखमध्ये एका लष्करी वाहनाच्या ताफ्यावर एका कड्यावरुन मोठी दरड कोसळली. परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासोबतच कॉर्प्सने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, ‘जीओसी फायर अँड फ्युरी आणि सर्व रँक लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप सिंग आणि लान्स दफादार यांनी सलाम करत आहोत. ३० जुलैला देशसेवेचे कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. या दु:खद प्रसंगी शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र संवेदना आम्ही व्यक्त करतो.

🛑चिपळूणात डाँक्टरच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या.- चिपळूणात उडाली खळबळ

चिपळूण :- प्रतिनिधी.

चिपळूण येथील उच्चशिक्षण घेत असलेल्या युवकाने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ओवेस जुलफीकार मुल्ला असे २२ वर्षीय मयत युवकाचे नाव आहे. मात्र आत्महत्या करण्यामागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेले नाही. ओवेसने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. हे कुटुंब चिपळूण शहरातील वाणी अळी येथे एकता अपार्टमेंटमध्ये राहते. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला, मात्र तो खूप वेळ झाला तरी बाहेर आला नव्हता त्यामुळे कुटुंब चिंतेत पडले. अखेर दरवाजा तोडून आत पाहिल्यावर ओवेसने लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.या सगळ्याची माहिती तात्काळ चिपळूण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आकस्मिक मृत्यू म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास चिपळूण शहरात घडला अशी माहिती चिपळूण पोलिसांनी दिली आहे. ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता. उच्च शिक्षण घेत असताना सगळे व्यवस्थित सुरू असतानाही त्याने नेमके कोणत्या कारणाने हे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही. ओवेसच्या मृत्यूमुळे चिपळूण शहर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबावरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आत्महत्या प्रकरणाच्या पुढील तपास चिपळूण पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.