Homeकोंकण - ठाणे2025 मध्ये राम मंदिराचं काम पूर्ण होणार. डिसेंबर 2023 पासून भक्तांसाठी गाभाऱ्यातून...

2025 मध्ये राम मंदिराचं काम पूर्ण होणार. डिसेंबर 2023 पासून भक्तांसाठी गाभाऱ्यातून दर्शन

लखनऊ,:-वृतसंस्था.

अयोध्येतील जन्मभूमीवर उभारले जात असलेले राममंदिर २०२३ मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. त्यामुळे भाविक मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२३ मध्ये मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर रामलल्लांच्या दर्शनासोबतच मंदिराच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्याचे काम सुरू राहील.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या ट्रस्टने बुधवारी सांगितले की, २०२३ पर्यंत गाभारा आणि तळमजल्याचे काम पूर्ण होईल. २०२५ पर्यंत मंदिर पूर्णपणे बांधून तयार असेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी राममंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केले होते. त्यानंतर आता वर्षभराने ट्रस्टने मंदिर उभारणीच्या प्रगतीबाबत माहिती दिली.ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, पायाचे ६० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. त्यानंतर प्लिंथचे काम सुरू केले जाईल. प्लिंथसाठी मिर्झापूरहून दगड आणले जात आहेत. दगड घडवण्याच्या कामालाही कारागिरांनी सुरुवात केली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले की, पायाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड-दोन महिने लागतील. मुख्य मंदिरासाठी बंशी पहाडपुरातील खाण उघडण्याची प्रतीक्षा आहे.दगड काढण्याचे काम सुरू हाेताच दगडांवर नक्षी आणि घडणावळीचे कंत्राट दिले जाईल. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि प्रत्येक माळ्याची उंची २० फूट असेल. मंदिराच्या तळमजल्यात १६० खांब, पहिल्या मजल्यावर १३२ खांब आणि दुसऱ्या मजल्यावर ७४ खांब असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.