आजरा. प्रतिनिधी. ०६.
आजरा शहरात दि. ५ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील सोन्याचे दुकान, स्टोअर बजार, व एक पान शाँप अशा तीन दुकानात चोरट्यांनी चोऱ्या करत रोख रकमेस सह दोन लाख ६६ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असल्याच्या फिर्यादी यांनी आजरा पोलिसात तक्रार दिली आहे. आजरा येथील प्रितिष दिलीप चंदगडकर वय ३२. यांचे स्टोअर बजार, कुणाल दत्तात्रय पोतदार वय ३९. सोन्याचे दुकान पोतदार ज्वेलर्स, तर सलाम अब्दुल काकतीकर वय .४५ पान शॉप. यांचे दुकानात चोरी झाली असल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे अधिक तपास पो.शेळके करत आहेत.