जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.
आजरा.- प्रतिनिधी

जनता सहकारी गृहतारण संस्थेचे व्हा.चेअरमन प्रो. डॉ. अशोक बाचूळकर यांना महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान मिळाल्या बदद्ल तसेच भौतिकशास्त्र विषया मध्ये शिवाजी विद्यापीठा कडुन पी.एच.डी मिळाले बदद्ल प्रो. डॉ. सौ. लता दिनेश शेटे यांचा संस्थेत सत्कार करण्यात आला.
आज-यातील जनता सहकारी गृहतारण संस्थेचे व्हा. चेअरमन प्रो. डॉ. अशोक बाचूळकर यांना महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मानीत करण्यात आले आहे. त्या निमित्त संस्थेचे संचालक प्रा.डॉ. अशोक सादळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रो. डॉ. सौ. लता दिनेश शेटे यांना पी.एच.डी मिळाले बदद्ल संस्थेच्या संचालिका प्रा.सौ. नेहा सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक चेअरमन मारुती मोरे यांनी केले, प्रा. डॉ. अशोक सादळे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक आणि जनरल मॅनेजर श्री. मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
कोणी घर देता का घर… म्हणण्याची वेळ आली ८० वर्षाच्या गंगाराम कांबळे या वृद्धावर (प्रशासनाचे दुर्लक्ष – वृद्धाचे बरे वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार शिवाजी गुरव यांचा इशारा.)
आजरा.- प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील गाव आरदाळ येथील गंगाराम कांबळे सध्या पडक्या धोकादाय घरात रहात आहेत. चालू पावसाळ्यात त्यांच्या घराची पडझड झाली आहे. ग्रामसेवक पाहणी करून गेले मात्र त्यांची व्यवस्था कोणी प्रशासनाने केली नाही ते सध्या धोकादायक पडक्या घरात रहात आहेत. आरदाळ गावचे सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते डॉ. महादेव ढोकरे – पाटील, सुहास पाटील, बयाजी ससाणे यांच्यासह कांही कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांना मर्यादा येत आहेत.
गंगाराम कांबळे यांचे घर कोणत्याही क्षणी वरील छत खाली पडण्याच्या स्थितीत आहे; मात्र गंगाराम त्याच धोकादायक घरात राहत आहेत. त्यांची पत्नी मरण पावल्याने ते एकटेच घरी राहतात. त्यांचे वय ८० च्या घरात आहे त्यामुळे त्यांना पूर्वीसारखे मजुरीचे कामही जमत नाही. गळक्या ओल्या घरात आज ते राहत आहेत. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतो मात्र सुरक्षित राहण्याच्या जागेबाबत कोणीही पुढे आले नाही. गंगाराम कांबळे यांना सध्या आसऱ्याची गरज आहे. शिवाय प्रशासनाने त्वरित पाहणी करून मार्ग काढावा. सध्या गंगाराम कांबळे त्याच घरात राहतात वादळी पाऊस जोरात चालू आहे. वादळामुळे त्यांचे घर कोसळून त्यांचे बरे वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद शासनाने घ्यावी.
चौकट
शासनाने २०२४ मध्ये अतिवृष्टीने पडझड झालेले तालुक्यातील घरांचा पंचनामा केला. परंतु पात्र लाभार्थी यांना अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही.. दरम्यानच्या काळात नुकसान भरपाईची मागणी होत असताना. अचानक लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालय महसूल विभागाच्या वतीने प्रसिद्ध करून. लाभार्थ्यांना पुन्हा केवायसी साठी आधार कार्ड व पॅन कार्ड ची मागणी करण्यात आली. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना वाटले की आता नुकसान भरपाई मिळणार.. आहे परंतु कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून आजपर्यंत आलेली नाही.. लाभार्थ्यांना केवायसी च्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रकार शासनाचा चालू आहे. त्यामुळे प्रथम तालुक्यातील २०२४ मध्ये घरांची पडझड नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी लाभार्थ्यां कडून होत आहे. अंदाजे तालुक्यातील सहाशे पेक्षा अधिक लाभारती आहेत..