Homeकोंकण - ठाणेमंत्रीपद धोक्यात, इडापिडा टळो, संकट दूर होवो.- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी...

मंत्रीपद धोक्यात, इडापिडा टळो, संकट दूर होवो.- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन🟣बीडमध्ये तरूण डाँक्टरची इंजेक्शन घेवून आत्महत्या🟣मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात १८- २० गाड्या एकमेकांवर धडकल्या.- अनेकजण जखमी.

🟣मंत्रीपद धोक्यात, इडापिडा टळो, संकट दूर होवो.- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन
🟣बीडमध्ये तरूण डाँक्टरची इंजेक्शन घेवून आत्महत्या
🟣मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात १८- २० गाड्या एकमेकांवर धडकल्या.- अनेकजण जखमी.

🟣मंत्रीपद धोक्यात, इडापिडा टळो, संकट दूर होवो; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन

नंदुरबार – प्रतिनिधी.

विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. अशातच संकटामध्ये सापडलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज शनिदेवाच्या चरणी धाव घेतली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देशातील एकमेव शनी देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमंडळ येथील शनी मंदिरात कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजाअर्चा केली.

शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे. शेतकऱ्याबाबत केलेलं वक्तव्य किंवा विधीमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल व्हिडीओ असेल, यामुळे ते विरोधकांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर आरोपांची राळ उडवली जात आहे, तर त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण मंगळवारी त्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व घडामोडी घडत असतानाच आपल्या मागची इडा पिडा टळावी यासाठी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता शनिदेवाला साकडं घातलं आहे. लवकरच कोकाटेंच्या राजीनाम्या बाबतचं चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे’, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.

🟣बीडमध्ये तरूण डाँक्टरची इंजेक्शन घेवून आत्महत्या

बीड – प्रतिनिधी

बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये तरुण डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुण डॉक्टर हा खासगी रुग्णालयात आरएमओ म्हणून कार्यरत होता. तरुण डॉक्टरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय ढवळे असे डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर ढवळे हा भूलतज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याने औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. डॉ. संजय ढवळेने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समोप आलेलं नाही. मात्र, तरुण डॉक्टरने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या डॉक्टरने आत्महत्या नेमकी का केली? हे अद्याप समोर आलेलं नाही. बीडचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

🟣मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; १८-२० गाड्या एकमेकांवर धडकल्या; अनेकजण जखमी.

खोपोली – प्रतिनिधी.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल १८-२० गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या आहेत. या अपघातात अनेक गाड्यांचा चक्काचूर झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक प्रवासी देखील गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. हा भारतातील सर्वात व्यग्र द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात. शनिवारी रविवारी ही संख्या २ लाखांचा आकडा पार करते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस वाहतूक व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करीत असतात. आजही प्रचंड मोठी वर्दळ लक्षात घेऊन पोलिसांनी नियोजन केले होते. परंतु खंडाळ्यानजीक झालेल्या अपघाताने संपूर्ण नियोजन कोलमडून गेले आहे. जवळपास ५ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

लोणावळा खंडाळा घाटातून खाली उतरल्यानंतर दत्ता फूड मॉलच्या समोर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल १८ ते २० गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. कंटनेरने जोरदार वेगात वाहनाला धडक दिल्याने अनेक गाड्यांना एकाच वेळी धडक बसली. अपघातात तीन वाहनांचा अगदी चक्काचूर झाला आहे. अपघातात काही जणांना दुखापत झाल्याची माहिती देखील मिळत आहे. अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघातग्रस्त वाहनांच्याच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या वाहनांना अपघातग्रस्त वाहनांना ओलांडून जाता येत नसल्याने जवळपास चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.