Homeकोंकण - ठाणेउपचारासाठी मदत हवीय? 'मुख्यमंत्री साहाय्यता निधी'तून मदत कशी मिळवायची जाणून घ्या.!🛑भाजप -...

उपचारासाठी मदत हवीय? ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून मदत कशी मिळवायची जाणून घ्या.!🛑भाजप – महायुती सरकारचा कडक निर्णय.- महसूल कर्मचाऱ्यांना दांडी मारणे होणार अवघड.- फेस ॲप – जिओ – फेन्सिंगने हजेरी

🟥उपचारासाठी मदत हवीय? ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून मदत कशी मिळवायची जाणून घ्या.!
🛑भाजप – महायुती सरकारचा कडक निर्णय.- महसूल कर्मचाऱ्यांना दांडी मारणे होणार अवघड.- फेस ॲप – जिओ – फेन्सिंगने हजेरी

🟥उपचारासाठी मदत हवीय? ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून मदत कशी मिळवायची जाणून घ्या.!

पुणे :- प्रतिनिधी.

जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी हा आशेचा किरण बनला आहे. या निधीतून यंदा जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात पावणेदोन हजारांहून अधिक रुग्णांना १७ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचाराकरिता सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात ४४५ रुग्णालये संलग्नित आहेत.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचारासाठी मदत करण्यात येते. मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ हजार रुपये, ५० हजार, १ लाख आणि जास्तीत जास्त २ लाख रुपयांची आजारनिहाय मदत करण्यात येते. आता जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दुर्धर आजारावरील उपचारांसाठी मदत, तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साहाय्य याबाबत नागरिकांना जिल्हास्तरावर सुविधा देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे. साहाय्यता निधीतून पुणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत १ हजार ७८५ रुग्णांना १७ कोटी २८ लाख रुपयांची मदत झाली आहे. मात्र, या साहाय्यता निधीतून उपचार पूर्ण झालेल्या रुग्णाला, तसेच राज्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मदत केली जात नाही.

जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांनी या कक्षाद्वारे मदत मिळविण्यासाठी https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, कक्षाच्या ई-मेल cmrfpune@gmail.com यावर ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष कक्षात येऊन अर्ज सादर करता येतो. ई-मेलद्वारे अर्ज केलेल्यांनी मूळ अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रे एकत्रितरीत्या मदतीचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली.

कोणत्या आजारांना मदत?

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ठरावीक आजारांसाठी मदत दिली जाते. त्यात हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थिमज्जा, हात, खुबा, गुडघा प्रत्यारोपण, अंतस्थ कर्णरोपण (कॉकलीअर इम्प्लाँट), कर्करोग, अस्थिबंधन शस्त्रक्रिया, नवजात शिशू, लहान बालकासंबंधित आजार, रस्ते अपघात, मेंदू आजार, हृदयरोग, डायलिसीस, जळीत रुग्ण आणि विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारांसाठी मदत करण्यात येते.

🛑भाजप महायुती सरकारचा कडक निर्णय.- महसूल कर्मचाऱ्यांना दांडी मारणे होणार अवघड.- फेस ॲप – जिओ – फेन्सिंगने हजेरी
फेसअँपवर हजेरी न दाखवल्यास गैरहजर समजले जाणार.- ज्या गावात नोकरी आहे. तिथूनचं उपस्थिती लावावी लागणार
( तलाठयांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यत फेसअँपद्वारे हजेरी लावावी लागणार.) महसूलच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेसअँपद्वारे हजेरी बंधनकारक.- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

मुंबई.- प्रतिनिधी.

फेस ॲप -जिओ-फेन्सिंग सिस्टीम हे महसूल कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.यामुळे कर्मचा-यांच्या कार्यालयीन उपस्थितीची नोंद कॅमेरा- स्थानयुग्मित (जीपीएस) द्वारे कार्यालयातच होणार आहे .

🛑काय होणार बदल

केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ-फेन्सिंग प्रणाली अनिवार्य केली असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता कार्यालयातूनच नोंदवली जाणार आहे. त्यामुळे, ऑगस्ट महिन्याचा पगार (सप्टेंबरमध्ये मिळणारा) केवळ फेस ॲपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.याबाबतचा स्पष्ट शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता आणण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेणे सुरु केले आहे.

ऑगस्ट महिन्याचे वेतन (जे सप्टेंबरमध्ये मिळणार आहे) केवळ त्या कर्मचाऱ्यांना दिले जाईल, ज्यांनी फेस ॲपमध्ये उपस्थिती नोंदवली असेल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले, की अधिकृत शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल या उपाययोजनेचा उद्देश अधिक पारदर्शकता, प्रशासनात गतिशीलता, व लोकाभिमुख सेवा वाढविण्याचा आहे.

ऍप कसे कार्य करेल?

फेस ॲप कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित? असेल, जिओ-फेंसिंगची अचूक त्रिज्या (उदाहरणार्थ, किती मीटर जवळपास कार्य करेल?), डेटा गोपनीयता आणि स्टोरेज कसे राखले जाईल? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत जी. आर. निघाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

🅾️सरकारी अधिसूचना/परिपत्रक –

आता लवकरच जारी होणाऱ्या शासन आदेशात या तांत्रिक तपशीलांचा समावेश असेल.

फेस ॲप वापरण्याची प्रक्रिया

कर्मचाऱ्यांना (शासन मान्य) मोबाईलवर डाऊनलोड करणे आवश्यक असेल मोबाईल क्रमांक, कर्मचारी आयडी व कार्यालयाचे तपशील भरावे लागतील.- ओटीपी वेरिफिकेशन केल्यानंतर, खाते सक्रिय होईल.फेस रजिस्ट्रेशन (फेस स्कॅन) एकदाच करणे आवश्यक.

🟥दररोज उपस्थिती नोंदवण्याची प्रक्रिया

सकाळी (हजेरी करताना) कर्मचाऱ्याचा चेहरा स्कॅन केला जाईलजिओ-फेन्सिंग तपासणी: शमोबाईलच्या जीपीएस द्वारे तुमचे स्थान ऑफिसच्या पूर्वनिर्धारित त्रिज्येत आहे का ते तपासले जाईल (उदा. 100 मीटर). ही प्रक्रिया यशस्वीअसल्यास हजेरी लावली जाईल.जिल्हा स्तरावर प्रशासनाला हजेरी अहवाल डाउनलोड करता येईल व डेटा वापरून वेतन काढले आईल. चेहरा आणि स्थान डेटा केवळ हजेरीसाठीच वापरला जाईल.वार्षिक सेवा नोंदी अपडेट केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.