जनता सहकारी बँक सहकार से समृद्धी या धोरणाप्रमाणे मार्ग क्रमन करत आहे.- चेअरमन मुकुंदराव देसाई.
( ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १३/७/२०२५ रोजी खेळीमेत संपन्न झाली. स्वागत व प्रास्ताविक व ३१/०३/२०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, लेखापरिक्षण अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक व इतर विषय संचालक मंडळाच्या वतीने सादर चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले चेअरमन श्री देसाई म्हणाले. जनता सहकारी बॅक योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे. सर्वांचे श्रद्धास्थान व बँकेचे कुटूंब प्रमुख कै. अमृतकाका देसाई व कै. बळीरामजी देसाई यांचे विचार प्राणपणाने जोपासून त्यांची दुरदृष्टी, नाविण्यपूर्ण कल्पकता, विकासाभिमुख नेतृत्वाखाली व मौलीक मार्गदर्शनाने बँकेने बँकींग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून प्रगतीचा आलेख कायम राखला आहे.
आम्ही सर्व संचालक मंडळ, सदस्य एक विचाराने व अत्यंत पारदर्शकपणे बँकेचा कारभार करीत आहोत. तसेच आपणा सर्वांच्या सहकार्यानेच बँकेचा नावलौकीक दिवसेंदिवस वाढत असून बँक प्रगतीचा वटवृक्ष होत आहे. सांगायला अभिमान वाटतो की, आपली बँक सहकार से समृद्धी या धोरणाप्रमाणे मार्ग क्रमन करत आहे. ही बँक प्रगतीपथावर आणताना अनेक व्यक्तींचे योगदान लाभले आहे. सर्व सामान्याचे हित व सेवाभावी वृत्ती, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची नाळ जोडून बँक आपले वेगळेपण टिकवून आहे.
अहवाल सालात बँकेच्या संचालक मंडळांनी अतिशय एकोप्याने, निस्वार्थपणे व अभ्यासपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतलेने व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केलेने बँकेच्या प्रगतीमध्ये आणखी संख्यात्मक व गुणात्मक उल्लेखनिय वाढ झालेली आहे. बँकेने रिझर्व बँकेच्या सर्व नियमांचे व आदेशांचे तंतोतंत पालन केलेले आहे. म्हणुनच बँकेचा प्रगतीचा नावलौकिक संपुर्ण कार्यक्षेत्रात आहे. तसेच बँकेच्या प्रगतीचे श्रेय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील व त्यांच्या सर्व टीममधील सिनी. ऑफिसर, ज्यु, ऑफिसर, शाखाधिकारी, क्लार्क, शिपाई व पिग्मी एजंट या सर्वांच्या अथक परिश्रम घेतले आहे.
💥अहवाल सालातील महत्त्वाच्या बाबी –
१) अहवाल सालात बँकेच्या व्यवसायामध्ये रु. ८२ कोटी इतकी विक्रमी वाढ होवून बँकेचा एकूण व्यवसाय रु. ६६९ कोटी इतका झालेला आहे.
२) अहवाल सालात बँकेस रु. ७ कोटी ९५ लाख इतका विक्रमी ढोवळ नफा झालेला आहे.
३) आपल्या बँकेने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वसुलीचे प्रयत्न केल्याने सतत निव्वळ एन पी ए ०% ठेवणेत यश आलेले आहे.
४) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्व तरतुदी व आयकर वजा जाता बँकेस रु. ३२६.७५ लाख इतका निव्वळ नफा झालेला आहे. सदर निव्वळ नफ्यातून सभासदांना ९% दराने लाभांश देण्याची शिफारस मा. संचालक मंडळाने केलेली आहे. त्यास मंजुरी द्यावी असे आपणांस नम्रपणे आवाहन करतो,
५) रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे स्वभांडवल पूर्तता प्रमाण (CRAR) किमान १२% ठेवणे आवश्यक असता बैंकेने सदर प्रत्यक्ष प्रमाण १४.९९% इतके ठेवलेले आहे. यावरुन बँकेची सक्षमता दिसून येत आहे.
६) सन २०२४-२५ वैधानिक लेखापरिक्षण अहवालानुसार आपल्या बँकेच्या नेटवर्थ (Net Worth) मध्ये वाढ होवून नेटवर्थ रु. ३४७४.०७लाख इतके झालेले आहे.
७) अहवाल सालात रिझर्व बँकेने बँकेला नवीन दोन शाखा चालु करणेची परवानगी दिलेली आहे. त्यातील शाखा कल्याण व गारगोटी लवकरच चालू करत आहोत.

८) आपल्या बँकेने ग्राहकासाठी अत्याधुनिक युपीआय सुविधा सुरु केली आहे. याशिवाय बँकेच्या २० शाखांच्या ठिकाणी १० ए टी एम सह, मोबाईल बँकींग, आर टी जी एस, एन ई एफ टी, आय एम पी एस, पॉज, ई कॉमर्स, सी टी एस क्लेअरींग इ. बँकींग सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत या सर्व सेवांचा आपण लाभ घ्यावा असे मी आपणांस नम्र पणे आवाहन करतो.
९) आपली बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम (FSWM) बँक म्हणून वर्गीकृत आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे.
१०) आपल्या बँकेने सुमारे १०३४ सभासदांना रु. ११६०७.३७ लाख आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व पंतप्रधान सुक्ष्म अन्न ११) प्रक्रिया योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करून नवीन तरुण व्यवसाईकांना व्यवसायात उभारी देणेचे काम केले आहे.
बँकेच्या व्यवस्थापनातील आदर्श कार्यप्रणालीमुळे बँकींग फ्रंटीअर, बँको ब्ल्यु रिबन व कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन कोल्हापूर यांचेकडून सलग बेस्ट बैंक, बेस्ट एन.पी.ए. मॅनेजमेंट, बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन, बेस्ट टर्नराऊंड असे अनेक पुरस्काराने सन्मानित केलेली बँक.
बँकेच्या प्रगतीचे तुलनात्मक विश्लेषण यासह सन २०२४-२५ चा ताळेबंद, नफा तोटा पत्रक व इतर विषय मंजुरीसाठी आपणापुढे सादर करत आहे. त्यास एकमताने मंजुरी द्यावी अशी विनंती आहे चेअरमन श्री देसाई यांनी केली.

यावेळी विविध मान्यवरांचा यशस्वी विद्यार्थ्यांचा, बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अहवाल वाचन बॅकेचे सीईओ एम. बी. पाटील यांनी केले
यावेळी व्हा. चेअरमन अमित सामंत, संचालक महादेव टोपले, रणजीत देसाई, बाबाजी नाईक, जयवंत कोडक, शशिकांत नार्वेकर, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई, रेखा देसाई, नंदा केसरकर, महेश कांबळे, पांडुरंग तोरगले, संतोष पाटील, तज्ञ संचालक एस एम अस्वले, एॅ. एस एस निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी एम बी पाटील, तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सदस्य प्रमुख अधिकारी वर्ग माजी संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन एकनाथ गिलबिले यांनी केले. तर संतोष पाटील यांनी मानले.
