🛑९ जुलैच्या गिरणी कामगारांच्या आझाद मैदानावरील महामोर्चाला.- संघटनेच्या नेत्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाविकास आघाडीचे नेते घटक पक्ष नेते..यांची प्रमुख उपस्थिती.
🟥विरोधी पक्षनेतेपदासाठी आक्रमक व्हा.- शिवसेना पक्षप्रमुख :- उध्दव ठाकरेंचे आमदारांना आदेश.
🛑गिरणी कामगार व वारसदार याना मुंबईतच घर द्या – ९ जुलै
महामोर्चाला संघटनेच्या नेत्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाविकास आघाडीचे नेते घटक पक्ष नेते..यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
गिरणी कामगार व वारसदार यांच्या एकजुटीचा आझाद मैदानावर दि. ९ जुलै रोजी महामोर्चा असले बाबत सर्व श्रमिक संघाच्या वतीने प्रसिद्धी पत्र काढण्यात आले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे म्हटले आहे. गिरणी कामगारांना व वारसदारांना फसवण्याचा महायुतीचा सरकारचा खेळ अयशस्वी झाला आहे. शैलू वांगणीला आला वारसदार फसत नाहीत. त्याना बनवाबनवी लक्षात आली आहे.
गिरणी कामगारांना पोलिसांच्या सहाय्याने दडपण्याचा कोल्हापूर पालक मंत्यांचा डाव फसला. गिरणी कामगार व वारसदार दबले नाहीत. त्यांनी गारगोटी मध्ये हुतात्मा स्मारकाला हार अर्पण करून स्पष्ट संदेश दिला. हुतात्म्यांनी स्वातंत्र्य मिळवले. हुतात्म्यांनी महाराष्ट्र घडवला, हुतात्म्यांनी मुंबई मिळवली. स्वतंत्र भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत सतेत बसणार्याला गिरणी कामगारांच्या हौतात्म्याची जाणीव द्यावी लागेली है महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. या आंदोलनाने गिरणी कामगारांचा व वरसदाराचा निर्धार वाढवला. वाड्या वरचे खरकटे खाऊन एकडे तिकडे फिरणारी झुरळे मुंबईत म्हाडा पर्यंत जाऊन मोकळ्या हातानी परत आली. आता झुरळांची फिकीर करू नका.
दरम्यान गिरणी कामगारात व वारसदारात सतत वाढणार्या जागृतीने सर्व संघटनाना एकत्र यावे लागले आहे. मुंबईतच घर ही मागणी सर्वानी उचलून धरली आहे. यामुळे उदय भट व बी के आने यांच्या नेतृत्वाखालील ६ संघटना व सचिन भाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखालील आर एम एम एस एकत्र आल्यामुळे आता ९ संघटनांची जूट झाली आहे.
हिंदी सक्ती केलेल्या राज्यकर्त्याना मराठी माणसाच्या आत्मसन्मानाने खजील तोंडाने जी आर मागे घ्यायला भाग पाडले. हिंदी सक्तीचा जी आर रद्द करताना खोटे बोलणारे व दुसऱ्याच्या नावाने बील फाडणारे फडणवीस शिंदे उघडे पडले. लाडक्या बहिणीना सरकारचे पैसे वाटून सत्ता मिळवली. ती सत्ता लाडक्या बहिणीच्या लेकरांवर हिंदी सक्ती साठी वापरणारे उघडे पडले. मराठी माणसानी त्यांचा डाव हाणून पाडला.

अशा परिस्थितीत मुंबईला जायचा निर्णय सर्व ९ संघटनांनी एकमताने केला आहे. मुंबई आम्ही मिळवली, मुंबई आम्ही घडवली, ती मुंबई अदानीला, अंबानीला द्यायची आणि मराठी माणूस गिरणी कामगार मुंबई बाहेर फेकून द्यायचा हा शिंदे फडणविसांचा डाव उधळून लावावा लागेल.
शिंदे (नगरविकास मंत्री) फडणविसानी १८०० एकर जमीन भांडवलदारांना दिली, शिंदे फडणविसानी धारावी अदानीला दिली, शिंदे फडणवीस बंदरपट्टी हॉटेल मालकांना देणार आणि ज्यांनी मुंबई घडवली ते सेलू वांगणीला का जाणार?
मुंबईत गिरण्यांच्या जमिनी आहेत, मुंबईत सरकारी जमिनी आहेत. गिरणी कामगार व वारसदार याना मुंबईतच घर मिळाले पाहिजे.

गिरणी कामगार वारसदार याना पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याचे काम सत्ताधारी करणार नसतील तर ते काय कामाचे आहेत असे गिरणी कामगार व वारसदार विचारत आहेत.
या सर्व प्रश्नांचा निचरा झालाच पाहिजे.
दिनांक ९ जुलै रोजी आझाद मैदान मधील विराट महामोर्चामध्ये सर्व गिरणी कामगार आणि वारसदार सहभागी होवुया. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.तरी या मोर्चाला गिरणी कामगार व वारदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे, मार्गदर्शक संघटक दत्तात्रय आत्याळकर, शांताराम पाटील, (आजरा) धोंडीबा कुंभार, अमृत कोकितकर, रामजी देसाई, पद्मिनी पिळणकर, (गडहिंग्लज) गोपाल गावडे (चंदगड) राजू तवनोजीया, जोतीबा पाटील (बोडकेनट्टी ता. जि. बेळगाव) कृष्णात चौगुले (राधानगरी) भारती शेणवी, महादेव करवळ, बबन शिंदे (भुदरगड) लक्ष्मण कामते (कागल) तुकाराम तळप (शाहुवाडी) जगन्नाथ भोसले, देवाप्पा मस्कर, संजय आनंदा पाटील, (पन्हाळा) सदाशिव खोपडे (शिराळा) यमगेकर (विटा) शंकर पाटील (सातारा) सुखदेव वीर, शिवाजीराव नलवडे (कोरेगाव) दिग्विजय पवार, विठ्ठल पिसाळ (वाई) पांडुरंग डफळे (पाटण) विलास भोसले (खंडाळा) दिनकर काळभोर (कराड) कौशल्या काटकर (खटाव) यांनी केले आहे.

🟥विरोधी पक्षनेतेपदासाठी आक्रमक व्हा.- शिवसेना पक्षप्रमुख :- उध्दव ठाकरेंचे आमदारांना आदेश
मुंबई :- प्रतिनिधी.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. महाविकास आघाडीला ते मिळावं अशी अपेक्षा आहे. मात्र ते अद्याप ही विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेलं नाही. वारंवार पत्र देऊन देखील अध्यक्ष विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना देत नसल्याची भावना मविआमध्ये आहे. त्यासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभेत आक्रमक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेत आक्रमक व्हा असे आदेश दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातील आमदारांची बैठक घेतली. विरोधी पक्षनेतापद अजून ठाकरे गटाला का मिळालं नाही. याची चर्चा झाली. त्याबद्दल सभागृहात प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत? असा प्रश्न त्यांनी सर्वांसमोर उपस्थित केला. याआधी शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जावून पत्रव्यवहार करायचे. मात्र उद्यापासून त्यांच्या दालनात न जाता सभागृहात सर्व आमदारांनी या विषयी आवाज उठवावा असं ठाकरे यांनी सागितलं.त्यामुळे आता थेट सभागृहात अध्यक्षांना जाब विचारला जाणार आहे. तशी रणनिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केली आहे. जर सभागृहात थेट अध्यक्षांना विचारलं तर ते थेट पाटलावर ठेवलं जाईल. या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी या सूचना दिल्या आहेत. दरम्यान यावेळी अधिवेशनात आमदारांच्या कामगिरीचा आढावा ही यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. रोज सकाळी विरोधी पक्षाचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन होतं. पण ते ज्या पद्धतीनं व्हायला पाहीजे ते होत नाही याबाबतही उद्धव यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातावर मोजण्या इतके विरोधक आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार या आंदोलनास उपस्थित का राहत नाहीत असा देखील सवाल उद्धव ठाकरेंनी या बैठकीत उपस्थित केला.
उद्यापासून सर्व आमदारांना आंदोलनास उपस्थित राहून विरोधकांचे प्रश्न कठोरपणे मांडण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांचे नवे रूप सभागृहात आणि सभागृहा बाहेर बघायला मिळेल असं बोललं जात आहे.