Homeकोंकण - ठाणेकृषी कन्याची सोनवडी सुपे येथे भेट🛑भारताच्या प्रगतीत अभियंत्यांचे योगदान म्हतपूर्ण:.- डॉ. दिनेश...

कृषी कन्याची सोनवडी सुपे येथे भेट🛑भारताच्या प्रगतीत अभियंत्यांचे योगदान म्हतपूर्ण:.- डॉ. दिनेश हंचाटे.

🛑कृषी कन्याची सोनवडी सुपे येथे भेट
🛑भारताच्या प्रगतीत अभियंत्यांचे योगदान म्हतपूर्ण:.- डॉ. दिनेश हंचाटे.

कृषी कन्याची सोनवडी सुपे येथे भेट.


बारामती : प्रतिनिधी.

Oplus_131072

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती आणि समृद्ध विचाराने लोकांची मस्तके परिवर्तन करण्यासाठी आलेल्या कृषीकन्यांनी सोनवडी सुपे गावचा हुबेहूब नकाशा चक्क रांगोळीतून रेखाटल्याने गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
बारामती कृषी महाविद्यालयाच्या किर्ती ढवणे,मानसी धुमाळ,वैष्णवी घोडके,दर्शना गुरव,अनुजा माने,रेश्मा सातपुते,नेहा वाघचवरे या कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत सोनवडी सुपे येथे तीन महिने मुक्कामी आहेत. कृषीकन्यांनी गावात असणाऱ्या विविध मृदा जमा करून गावातील मृदेचे प्रकार नकाशातून दर्शविले. तसेच त्यांनी विविध फळे व धान्ये यांच्या सह्यायाने गावातील पीक पद्धत नकाशातून दाखवली. कृषीकन्यांनी शाळेच्या प्रांगणात रांगोळीच्या माध्यमातून गावाचा नकाशा काढला ते पाहून शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.


या कृषी कन्यांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा.एस.पी.गायकवाड व एस.व्ही.बुरुंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गोंडगे,केंद्रप्रमुख बाळासाहेब नामदास, आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

🛑भारताच्या प्रगतीत अभियंत्यांचे योगदान म्हतपूर्ण:
डॉ. दिनेश हंचाटे.

बारामती: प्रतिनिधी.

Oplus_131072

अभियंता म्हणजे वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर करून मानवी जीवनातील समस्या सोडवणारा, नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि उद्योग विकसित करणारा व्यक्ती. अभियंते विविध क्षेत्रात कार्यरत असतात – सिव्हिल, यांत्रिक, इलेक्ट्रिकल, संगणक, केमिकल, आदी म्हणून भारताच्या प्रगतीत अभियंत्यांची भूमिका म्हतपूर्ण आसल्याचे प्रतिपादन डॉ. दिनेश शालन भगवान हंचाटे, यांनी केले.
बारामती दौंड येथील विविध क्षेत्रातील अभियंता यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी बारामती व दौंड तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियंते हे देशाच्या प्रगतीचे कणा आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा, उद्योग, तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहतूक, जलसंपदा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
भारतातील प्राचीन अभियंते – सिंधू संस्कृतीतील शहरांचे नियोजन, दक्षिण भारतातील मंदिरे, गुजरातचे विहिरी, राजस्थानमधील किल्ले – हे सर्व त्या काळातील अभियंत्यांच्या कौशल्याचे उदाहरण आहेत.
आधुनिक भारताच्या विकासात अभियंत्यांनी मोठी भूमिका बजावली. रस्ते, पूल, धरणे, वीज प्रकल्प, मेट्रो, विमानतळ, औद्योगिक वसाहती, माहिती तंत्रज्ञान पार्क्स, स्मार्ट सिटी, हे सर्व अभियंत्यांच्या कल्पकतेमुळे शक्य झाले आहे.

सर एम. विश्वेश्वरय्या यांचे योगदान

सर एम. विश्वेश्वरय्या हे भारतातील सर्वात महान अभियंत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी कृष्णराज सागर धरण, सिंचन व पूरनियंत्रण प्रकल्प, मुंबईच्या बंदरातील ड्रेनेज सिस्टम, अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची रचना केली.
त्यांनी तंत्रशिक्षणाचा प्रसार केला आणि औद्योगिक विकासाला गती दिली. त्यांच्या कार्यामुळे भारतीय अभियंत्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.

💥महिला अभियंत्यांचे योगदान.

भारतातील महिला अभियंत्यांनीही समाजातील अडथळ्यांवर मात करून अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ए. ललिता, लिलाम्मा जॉर्ज कोशी, पी. के. थ्रेशिया, राजेश्वरी चॅटर्जी या महिलांनी केवळ तांत्रिक योगदानच दिले नाही, तर इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

💥अभियंत्यांचा समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम.

अभियंते केवळ पायाभूत सुविधा किंवा उद्योग निर्माण करत नाहीत, तर त्यांनी केलेल्या नवकल्पना आणि तांत्रिक सुधारणा यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि नागरिकांचे जीवनमान उंचावते.शाश्वत विकास, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.


नवीन पिढीसाठी प्रेरणा.


अभियंता दिवस (१५ सप्टेंबर) हा केवळ सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ नसून, देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हा दिवस विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करतो.
भारतातील अभियंते हे देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, औद्योगिक विकास, आणि समाजातील जीवनमान उंचावण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळेच भारत आज जागतिक स्तरावर वेगाने प्रगती करत आहे. या प्रसंगी प्रा. डॉ हांचाटे यांच्या हस्ते विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा ही सन्मान करण्यात आला. आभार प्रा. मनोज शिंदे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.