एक दिवस बळीराजासाठी.. पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी केली रोप लागण.- तर काही अधिकार्यांची उपक्रमाकडे पाठ..
आजरा – प्रतिनिधी

एक दिवस बळीराजासाठी असा कार्यक्रम कृषी विभागाच्या वतीने दि. ५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत अधिकारी यांनी शेताच्या बांधावर जाऊन एक दिवस बळीराजासाठी देण्याचा हा उपक्रम होता.
या उपक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात बांधावर न जाता रोप लागण करत एक दिवस बळीराजासाठी दिला. परंतु आजरा तालुक्यातील कृषी विभागाकडून एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावाला एक अधिकारी देण्यात आला होता. काही अधिकारी वगळता यामध्ये अनेक अधिकारी यांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवली असल्याचे अनेक गावाच्या शेतकऱ्यांच्याकडून बोलले जात आहे.
गावनिहाय यादीमध्ये . या यादीमधील गाव व त्या गावातील शेतकरी व या योजनेप्रमाणे ज्या ठिकाणी जाणार आहेत. त्या अधिकारी याची यादी आहे. परंतु यातील काही गावांमध्ये अधिकारी पोहोचलेच नसल्याचे समजते.
शेतकरी शेताच्या बांधावर या उपक्रमांतर्गत अधिकारी येणार असल्याने वाट पाहत असताना यातील काही अधिकाऱ्यांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

यामुळे कोणत्या गावाला कोणत्या अधिकारी नेमले होते याबाबत चौकशी करून प्रत्यक्षात कोणते अधिकारी शेताच्या बांधावर पोहोचले याची चौकशी तालुका कृषी अधिकारी यांनी करावी अशी मागणी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कडून होत आहे.