Homeकोंकण - ठाणेराज आणि उद्धव राजकारणात एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल?🟥14000 कोटींच्या...

राज आणि उद्धव राजकारणात एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल?🟥14000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट.नीरव मोदीच्या भावाला अटक

🟥राज आणि उद्धव राजकारणात एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल?
🟥14000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट.
नीरव मोदीच्या भावाला अटक

🟥राज आणि उद्धव राजकारणात एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल?

मुंबई :- प्रतिनिधी.

मराठीच्या मुद्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा आज शनिवारी वरळी येथील डोम येथे पार पडला. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले राज आणि उद्धव हे दोन भाऊ राजकारणातही एकत्र दिसणार का? आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार का? असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकारणात एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल घडू शकतात,असे म्हटले जात आहे.

🔴मराठी मते एकवटतील?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोर देतात. जर हे दोघे एकत्र आले, तर मराठी मतदारांमध्ये विखुरलेली मते एकवटली जाऊ शकतात. यामुळे शिवसेना आणि मनसेची एकत्रित ताकद वाढेल, विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासारख्या शहरी भागात दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचा सर्वात मोठा परिणाम दिसू शकतो. सध्या भाजप आणि शिंदे गटाची ठाकरे गटाशी स्पर्धा आहे. राज आणि उद्धव एकत्र आल्यास, मराठी मतांचे विभाजन थांबेल आणि त्यांना महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्याची संधी मिळू शकते. ठाकरे गटासाठी हे मोठे कमबॅक ठरु शकते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारसरणीला पुन्हा बळ मिळेल. यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखले जाऊ शकते.

🟥महाविकास आघाडीवर परिणाम?

राज आणि उद्धव एकत्र आले, तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल. राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना न पटणारा असू शकतो. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली, तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते. अशात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र रणनीती आखावी लागू शकते.

🔴शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर परिणाम?

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा ठाकरे बंधूंकडे आकर्षित होऊ शकतात. यामुळे शिंदे गटाची ताकद, विशेषतः मुंबई आणि कोकणात, कमी होऊ शकते. तर दुसरीकडे भाजपने मराठी मतांचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाशी युती केली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास, भाजपला मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागेल. यामुळे भाजपची ताकद देखील कमी होऊ शकते. राज ठाकरे यांच्या मनसेची घडी सध्या विस्कटलेली आहे. ती सावरण्याची संधी राज ठाकरेंच्या मनसेला मिळू शकते. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास मनसेला राजकीय वजन वाढण्याची संधी मिळेल. मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्याने त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने विरोधक प्रश्न उपस्थित करतात. तर राज ठाकरे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी मुद्द्यावर बोलतात. या वैचारिक फरकांचा समन्वय साधणे आव्हानात्मक असेल. मात्र राज आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? यावर दोन्ही पक्षांची भविष्यातील वाटचाल अवलंबून आहे.

🟥14000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट.
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक

मुंबई :- प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा प्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा भाऊ, नेहल मोदी, याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे.

🔴नेहल मोदीवर आरोप काय

हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. नेहल मोदी अनेक दिवसांपासून फरार होता तर, ईडी आणि CBI कडून प्रत्यार्पणाच्या वारंवार विनंतीनंतर अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.

👉अमेरिकन अभियोक्ता तक्रारीनुसार, नेहलवर PMLA च्या कलम 3 अंतर्गत मनी लाँड्रिंग आणि गुन्हेगारी कट रचणे व पुरावे नष्ट करण्याचे दोन आरोप आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, बेल्जियमची नागरिक नेहल मोदीला 4 जुलै रोजी ताब्यात घेतले गेले आहे.

🟥ईडी आणि सीबीआयच्या तपासात नीरव मोदीच्या वतीने गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशांच्या लाँडरिंगमध्ये नेहलने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. गुन्ह्यातील उत्पन्न लपवण्यासाठी त्याने बनावट कंपन्यांद्वारे आणि गुंतागुंतीच्या परदेशी व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर निधी लपविण्यास आणि हस्तांतरित करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.दरम्यान, 17 जुलै रोजी प्रत्यार्पणाची पुढील सुनावणी होईल. या सुनावणीदरम्यान नेहल जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता असून अमेरिकेच्या अभियोजन पक्षाने सांगितले की त्यांच्याकडून या याचिकेला विरोध केला जाईल.

🔴नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात

त्याचवेळी, नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात असून स्वतःदेखील आर्थिक घोटाळ्यांमध्ये आरोपी आहे. निरव मोदीवर अनेक गंभीर आरोप असून आता त्याच्या भावाला अटक झाल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. नेहल मोदीला झाल्याच्या बातमीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) वापरून पीएनबीला सुमारे 13,500 कोटी रुपयांची कर्जे फसवल्याप्रकरणी नीरव मोदी, त्याचा काका मेहुल चोक्सी, नेहल आणि इतरांना CBI व ईडीच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आहेत. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने आधीच मान्यता दिली आहे पण, त्याने असंख्य अपील दाखल केल्यामुळे भारतात आणण्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. लंडनच्या तुरुंगात नीरवला 2019 मध्ये फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले.

दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून 65 वर्षीय मेहुल चोक्सीला अँटवर्पमध्ये अटक करण्यात आल्याचे बेल्जीयम सरकारने सांगितले. 2018 मध्ये चोक्सी भारतातून पळून गेला आणि तेव्हापासून अँटिग्वा व बरबुडा येथे नागरिकत्व घेऊन राहत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.