कर्मचारी यांचे योगदानाने सहकार चळवळ बळकट.. प्रा. अर्जुन आबिटकर.
आजरा.- प्रतिनिधी.
आपल्या राज्यातील सहकार चळवळीचा नावलौकिक संपूर्ण देशात असून या चळवळीच्या योगदानात सहकारतील काम करणाऱ्या प्रत्येकाचे योगदान आहे, विशेष करून कर्मचारी यांच्या योगदानातून सहकार चळवळ बळकट झाल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी आजरा येथील सहकारी कर्मचारी यांच्या मोफत आरोग्य शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यस्थानी तहसीलदार समीर माने होते.
स्वागत व प्रास्ताविक गटसचिव सुभाष पाटील यांनी केले, सहायक निबंधक सुजयकुमार येजरे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. तहसीलदार श्री. माने यांनी शेतकरी आणि सचिव हे ग्रामीण भागातील शेवटचे घटक म्हणून काम करतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे काम आहे. सहकारी कर्मचारी यांनी ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक व शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करावे. पुढे बोलताना आबिटकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सूचनेनुसार या शिबिराचे जिल्हाभरात आयोजन केले आहे.
याचा सर्व घटकानी लाभ घेण्याचे अहवान केले. यावेळी तालुक्यातील सेवा संस्थेचे गटसचिव आणि पत संस्था कर्मचारी यांची आरोग्य तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र गुरव, आजरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील, डॉ.सुरजीत पांडव यांनी सर्व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी केली,

यामध्ये प्रामुख्याने रक्त तपासणी, ई. सी. जी. तपासणी, नेत्र तपासणी व आरोग्याच्या बाबतीतील सर्व तपासण्या करण्यात आल्या व निदाना बाबत योग्य मार्गदर्शन केले, यावेळी संजय घाटगे, महादेव पाटील, नेताजी पाटील, अर्जुन कुंभार, यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमास जे. एन. बंडगर, सुधीर कुंभार, राजेंद्र सावंत, विजय थोरवत, रणजित सरदेसाई, संभाजी सरदेसाई, विक्रम पाटील सुभाष चौगुले,संतोष ढोणूक्षे यांच्यासह तालुक्यातील गटसचिव व पतसंस्था कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. आतराष्ट्रीय सहकार वर्ष व केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिवसाचे औचित्य साधून आजरा मर्चंट या सहकारी संस्थेच्या आवारात ध्वजारोहन करून प्रभात फेरी काढण्यात आली आभार सहकारी अधिकारी प्रमोद फडणीस यांनी मानले..