Homeकोंकण - ठाणेकोल्हापूरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन.🟥लांजातील गवाणे येथे फासकीत अडकला बिबट्या(...

कोल्हापूरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन.🟥लांजातील गवाणे येथे फासकीत अडकला बिबट्या( वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त.)🛑राज्यात गेल्या अडीच वर्षात ४२७ पोलीसांचा मृत्यू‌-२५ पोलीसांनी केली आत्महत्या.- ७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.. अधिक पहा 👇

🟥कोल्हापूरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन.
🟥लांजातील गवाणे येथे फासकीत अडकला बिबट्या
( वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त.)
🛑राज्यात गेल्या अडीच वर्षात ४२७ पोलीसांचा मृत्यू‌-
२५ पोलीसांनी केली आत्महत्या.- ७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.. अधिक पहा 👇

🟥कोल्हापूरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन.

कोल्हापूर :- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये एका मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारुती व्हरकट असे या मुख्याध्यापकाचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याने शहरात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित विहिरीजवळ जाऊन मृतदेह बाहेर काढला. यावेळी, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला. विशेष म्हणजे कागल नगरपालिकेच्या शाळेत हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे, व्हरकट यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

🟥लांजातील गवाणे येथे फासकीत अडकला बिबट्या
( वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त.)

रत्नागिरी :- प्रतिनिधी.

Oplus_131072

लांजा तालुक्यातील गवाणे येथे बिबट्या फासकीत अडकल्याची घटना आज गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याची माहिती मिळताच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला फासकीतून सोडवत नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. गणू बाबू करंबळे राहणार गवाणे यांचे मा. ग. नं. 900 काजू बागेमध्ये वन्य प्राणी बिबट फासकीमध्ये अडकले बाबत सुरेश तानाजी करंबळे राहणार गवाने यांनी भ्रमणध्वनी द्वारे कळवलेनुसार तात्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. सदर बिबट वन्य प्राण्याला लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षित रित्या घेतले व त्याची पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांचेकडून तपासणी करून घेतली तो नर असुन अंदाजे दोन वर्ष वयाचा आहे तो सुस्थितीत असल्याची खात्री करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

सदरची कार्यवाही ही श्रीमती गिरजा देसाई विभागीय वन अधिकारी (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, राजेंद्र पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण राजापूर, न्हानू गावडे वनपाल पाली, महादेव पाटील वनपाल सामाजिक वनीकरण लांजा, विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर, बाबासाहेब ढेकळे वनरक्षक सामाजिक वनीकरण लांजा, कु. श्रावणी पवार वनरक्षक कोरले, कु. नमिता कांबळे वनरक्षक लांजा, सिद्धार्थ हिमगिरे वनरक्षक, सामाजिक वनीकरण लांजा, चंद्रकांत रामाने वन मजूर व रेस्क्यू टीमचे दीपक कदम प्राणी मित्र, मंगेश महेश लांजेकर, मयुरेश आंबेकर, मंगेश आंबेकर व गवाणे गावचे इतर ग्रामस्थ यांनी पार पडली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने गिरीजा देसाई विभागीय वनअधिकारी रत्नागिरी यांनी केले.

🛑राज्यात गेल्या अडीच वर्षात ४२७ पोलीसांचा मृत्यू‌-
२५ पोलीसांनी केली आत्महत्या.- ७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

🛑वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यात गेल्या अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून यात २५ आत्महत्यांचा समावेश आहे. ७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील प्रत्येक पोलिस युनिटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागणार आहे. आठवड्यात किती पोलिसांशी संवाद झाला याची नोंद ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.

🟥ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या ड्यूटीदरम्यान होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डीजी लोन आदी प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. पोलिसांच्या ड्यूटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्यूटी व प्रवासात जातात. त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत.

गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या काही वर्षांत हृदयविकार, कर्करोग, आत्महत्या अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. यात कार्डियाक अरेस्टमुळे ७५ मृत्यू, कर्करोगामुळे ६ मृत्यू झाले आहेत. पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून यात ४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी राज्यात २७० हॉस्पिटल्ससोबत टायअप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरतीसंदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. यासाठी सर्व विभागांना यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.