राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर कृतिशील विचारांचे सच्चे कार्यकर्ते.- विलास डवर आणि सहकारी. – बातमी नाही कौतुकाचे विचार..
राधानगरी.- प्रतिनिधी.
ना. आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाधित शेतकऱ्याला 25, हजार तर अपघातग्रस्त कुटुंबाला 20, हजाराची दिली आर्थिक मदत..
राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांचा काल वाढदिवस होता. या उत्साह आणि अमाप आनंदाच्या क्षणी कोणी जाहिराती दिल्या,कोणी डिजिटल लावले.कोणी लेख लिहिले तर कोणी अन्य कांही केले. या सर्वच कार्यकर्त्यांच्या अलोट प्रेमाचे आणि कट्टर निष्ठाचे कौतुक करावे तितके थोडेच आहेच.!
मात्र या सर्वात लक्षवेधी ठरला तो विलास डवर आणि त्याच्या मित्रपरिवाराचा माणुसकीला साद घालणारा एक आगळावेगळा उपक्रम.

संपूर्ण मीडियावर आज तुमच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी काळम्मावाडीतील गरीब शेतकरी नितीन माने यांच्या कुटुंबातील सहा म्हैशीना अज्ञात कारणाने विषबाधा झाल्याची घटना घडली होती. दिवसरात्र मुके जीव गोठ्यात लाळ गाळत - गाळत त्याच्यासमोरच तळमळत होते. योग्य उपचार करूनही चारा पाणी सोडल्याने पाच सहा दिवसांपूर्वी एक बाधित म्हैस दगावली.तर दुसरी..तिसरी त्याच वाटेवरती आहेत.सगळा प्रपंच केवळ म्हैशीच्याच जीवावर असल्याने पूर्णपणे कोलमडलेल्या नितीनला सर्वजण भावनिक आधार आणि धीर देते होते..मात्र त्याला गरज होती ती ठोस मदतीची ! याशिवाय भुदरगडमधील भालेकरवाडी येथील मारुती नारायण भालेकर यांचेही रोटर चालवताना अपघाती निधन झाल्याने याच्याही निराधार कुटुंबाला गरज होती सामाजिक दातृत्वाची !- काम पशुवैद्यकीय विभागाचे पालकमंत्री म्हणून निभावलं पालकत्व

ना. आबिटकर यांच्या वाढदिवसाला दरवर्षी वह्या, रेनकोट,खाऊ, रूग्णांना फळे वाटप असे शालेय उपक्रम राबविणाऱ्या विलास डवर या तळमळीच्या कार्यकर्त्याने यंदा साहेबांच्या वाढदिवसाला कांहीतरी वेगळे करूया अशी भावना आबिटकर प्रेमी मित्रमंडळीसमोर मांडली आणि सर्वांनीच त्याला मनापासून साथ दिली.त्यामुळेच हा माणुसकीला साद घालणारा एक स्तुत्य उपक्रम आकाराला आला.

या सर्व मित्रपरिवाराने सांघिक भावनेतून एक सामाजिक दायित्व म्हणून बाधित नितीन माने कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून 25,000 हजार रुपयांची मदत तर मारुती भालेकर यांच्या कुटुंबालाही 20,000 हजारांची रोख आर्थिक मदत देवून साहेबांचा वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला.यामुळे या दोन्ही कुटुंबाचा पूर्णपणे नसला तरी थोडासा भार हलका करण्याचा प्रयत्न झाला आहे.
मुळात कोणी किती मदत दिली यापेक्षा मदत केली ही भावनाच उदात्त आणि अमाप कौतुकाची असते.सामान्य माणसाला आधार देणाऱ्या आपल्या प्रिय नेत्यांचा तथा पालकमंत्र्यांचा आदर्श व सामाजिक वारसा चालविणाऱ्या विलास डवर, बापू खोराटे, बंडोपंत पाटील,योगेश, पाटील, सुनील घारे, भाऊ पालकर, सुभाष पाटील, प्रकाश हुजरे, विवेक डोंगळे, अमर फराकटे, दत्तात्रय, जाधव, संतोष पाटील, विष्णूराम डवर, संजय मुरगूडे, ऋषिकेश टिपुगडे, विजय पाटील, सर्जेराव पाटील, मयुर पोवार,लक्ष्मण गिरी,तेजस चांदम व राजू गायकवाड { तुमच्या जगण्यात द्रोपदीची थाळी अशीच भरभरून राहो हीच सदिच्छा – डॉ.चंद्रशेखर कांबळे राधानगरी..}