🛑महाराष्ट्र शासनाकडून मानसिंगराव खोराटे यांचा सत्कार. ( जी. एस. टी भरणा करून – प्रशासकीय व्यवहारात अग्रेसर.
🛑आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींकरिता सरपंच पदाच्या आरक्षण.- तीन गावचा समावेश. – अन्य आरक्षणामध्ये कोणताही बदल नाही.
💥महाराष्ट्र शासनाकडून मानसिंगराव खोराटे यांचा सत्कार. ( जी. एस. टी भरणा करून – प्रशासकीय व्यवहारात अग्रेसर.
चंदगड.- प्रतिनिधी

चंदगड हलकर्णी येथील दौलत अथर्व साखर कारखाना गेल्या आर्थिक वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम पाच क्रमांकामध्ये जी. एस. टी भरणा करून मानसिंगराव खोराटे यांनी उद्योजकांमध्ये आदर्श निर्माण केला. त्याचेच फलित म्हणून दि १ रोजी जी. एस. टी भरल्याने कोल्हापूर येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. २०१९ ला दौलत-अथर्व ने बंद पडलेला दौलत कारखाना चालवायला घेतला त्यानंतर यशस्वी घौडदौड करून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य न्याय दीला. २०१९ ला ज्यावेळी खोराटे यांनी दौलत चालवायला घेतला त्यावेळी अनेकांना शंका निर्माण केली होती.
की आता दौलत चालणार का.? कारण गेल्या दशकामध्ये बरेच उद्योजक दौलत चालवायला आले पण काही प्रमाणात अयशस्वी झाले. पण दौलत – अथर्व चे श्री .खोराटे यांनी यशस्वीपणे चालवत आहेत. तसेच काही दिवसापूर्वी देखील सोलापूर येथील साखर कारखाना जो की, गेल्या बारा वर्षांपासून बंद होता. तोही यशस्वीपणे चालवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कार्याला शेतकरी, सभासद, कर्मचारी यांच्याकडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
🛑आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींकरिता सरपंच पदाच्या आरक्षण.- तीन गावचा समावेश. – अन्य आरक्षणामध्ये कोणताही बदल नाही.
आजरा.- प्रतिनिधी.

शासनाने जाहीर केले प्रमाणे २३ जून २०२५ राजाच्या शासनाच्या सुधारित आदेशानुसार करण्यात आलेल्या आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींकरता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत पेरणोली ग्रामपंचायत सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित झाले आहे.
ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी यापूर्वी जाहीर झालेल्या २३ पैकी २०१० ते आजतागायत नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव न राहिलेल्या ग्रामपंचायतींमधून एका ग्रामपंचायती करिता नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत करण्यात आली. यामध्ये बहिरेवाडी खानापूर व पेरणोली ग्रामपंचायतींचा समावेश होता. चिठ्ठी द्वारे काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये पेरणोलीचे नाव आल्याने पेरणोली सरपंच पद आरक्षित झाले आहे.
आरक्षण सोडतीचे काम तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, निवडणूक विभागाचे अधिकारी यांनी पाहिले यामध्ये आजरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पद आरक्षणामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यांची नोंद घ्यावी अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. यावेळी तालुक्यातील काही सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.