Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा - हाजगोळी बंधाऱ्यावर जीवघेणा पडला खड्डा.- जलसंपदा विभागाचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे...

आजरा – हाजगोळी बंधाऱ्यावर जीवघेणा पडला खड्डा.- जलसंपदा विभागाचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष..का.?

आजरा – हाजगोळी बंधाऱ्यावर जीवघेणा पडला खड्डा.- जलसंपदा विभागाचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष..का.?

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131074

आजरा तालुक्यातील हाजगोळी बंधाऱ्यावरील स्लॅबच्या लोखंडी सळई बाहेर दिसत होत्या.
यावेळी दि. ३० मे २०२५ रोजी याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती.

आज दि. ३० जुनं २०२५ एक महिना झाला तरीही याकडे जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज या धरणामध्ये.. भला मोठा खड्डा पडला आहे.

व या विभागाकडून धरणावरून पाणी जात असताना ये जा करू नये असा फलक लावला आहे.. मुळात धरणावर पाणीच नाही आहे. धरणावर पडला आहे.‌

मोठा खड्डा… तरीही प्रशासनासह या विभागातील सरपंच आजी-माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य.. यांचे दुर्लक्ष.. किमान धरणावरून सळ्या बाहेर पडलेल्या दिसत होत्या. तरीही या विभागात जाऊन धरणाची डागडुजी करण्याची कल्पनाही दिली नाही..

साधे निवेदन देखील विविध पक्षाच्या पदाधिकारी यांनी व आजी-माजी जि. प., प. स. लोकप्रतिनिधी, सरपंच कोणीही दिले नाही.
त्यामध्ये अती पावसाने बंधाऱ्याला गळती लागू शकते यामध्ये जुनं मधील पाऊस अवजट वाहने, शालेय विद्यार्थी व प्रवासी वाहतूक एसटी असं सर्व वाहनांची ये जा सातत्याने या बंधाऱ्यावरून असते. आता या धरणावरून जाणारी सर्व वाहने बंद करण्यात आली आहेत..

किमान आता तरी जलसंपदा विभागाने या धरणाकडे लक्ष द्यावे.. अशी मागणी नागरिकांच्या कडून होत आहे.

चौकट.

याबाबत जलसंपदा विभागाचे अधिकारी यांचे मत आहे की. सदर धरणावर बाहेर पडलेल्या सळ्या याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. लवकरच धरणाचे काम होईल. परंतु सध्या सद्यस्थितीत पडलेला आज रोजीचा खड्डा.. हा धरणाच्या एक हात पलीकडे मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता आहे.. तो खड्डा धरणा वरती नाही..पण ती आमची व रस्ते विकास यांची जबाबदारी आहे.. तो खड्डा जलसंपदा विभागात येत नाही.. पण लवकरच डागडूजी केली जाईल.. असे त्यांनी भ्रमणध्वनी करून बोलताना सांगितले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.