Homeकोंकण - ठाणेपूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चळवळ संघटित करण्याचा निर्धार.- पूर्वतयारीसाठी गाववार बैठकांचे नियोजन.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चळवळ संघटित करण्याचा निर्धार.- पूर्वतयारीसाठी गाववार बैठकांचे नियोजन.

आजरा. प्रतिनिधी. ०२.

हिरण्यकेशी नदीकाठावरील पूरग्रस्त जनतेच्या पुनर्वसना बरोबर संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नदी खोऱ्याचे नियोजन व्हावे यासाठी चळवळ संघटित करण्याचा निर्धार आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई होते.

यावेळी झालेले निर्णय
१- गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी काठावरील गावांची पुररेषा निश्चित करावी. पुररेषेच्या आतील सर्व कुटुंबांचे न्याय पुनर्वसन करावे.
२- पुराच्या कारणांचा शोध घेऊन संपूर्ण खोरे निहाय संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करावी
३- उद्यापासून पूरग्रस्त गावातील एकही कुटुंब चुकु नये यासाठी कुटुंबांचा सर्व्हे करण्याची पूर्व तयारीच्या बैठका घेणे
३ पालकमंत्री ना सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ, आ राजेश पाटील यांना भेटून याबाबतचे निवेदन देणे
४ शुक्रवार दि ६ ऑगस्ट पंचायत समिती सभागृह गडहिंग्लज येथे कार्यकर्त्यांची व्यापक बैठक दु. 2.00वाजता
५- पुनर्वसन म्हणजे केवळ भूखंड आणि घरे नव्हेत तर गेली हजारो वर्षे त्या त्या गावांची एक व्यवस्था तयार झाली असते ती बाधित होते, त्याचा विचार करून पुनर्वसन करावे
६ कोरोना परिस्थिती थोडी निवळताच पूरग्रस्त जनतेची एक व्यापक परिषद संघटित करणे.

बैठकीला कॉ संपत देसाई, विद्याधर गुरबे, रमजान अत्तार, प्रशांत देसाई, वसंत नाईक, अजित बंदी, नागराज जाधव, अरविंद बारदेसकर, प्रा ज्ञानराजा चिंगळीकर, विजयकुमार पाटील, आझाद शेख, मळाप्पा गलगुंजी, गजानन पाटील, महादेव रेगडे, अजित मगदूम, रमेश पाटील, सिद्धगोंडा पाटील, समीर बेडक्याळे, कृष्णा सावंत, वंदन जाधव, बजरंग पुंडपळ यांच्यासह सर्वच गावातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार अरविंद बरडेस्कर यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.