Homeकोंकण - ठाणेसंवेदना फाउंडेशन प्रस्तुत.- “झोका कथास्तु” कथासंग्रह.- विद्यार्थ्यांच्या सेवेत.- नूतन कार्यालय पुस्तक प्रकाशन...

संवेदना फाउंडेशन प्रस्तुत.- “झोका कथास्तु” कथासंग्रह.- विद्यार्थ्यांच्या सेवेत.- नूतन कार्यालय पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.

आजरा. प्रतिनिधी. ०१

आजरा येथील संवेदना फाउंडेशन आयोजित “झोका इन्फोटेनमेंट कथास्तु” कथासंग्रह.- विद्यार्थ्यांच्या सेवेत येत असून या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थी मित्रांना होणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी आजरा येथे दि. ०१ रोजी. नूतन कार्यालय व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सावंत होते. तर एस एस हायस्कूल नेसरीचे माजी प्राचार्य एस. एस. मटकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती प्राचार्य शिवाजी गुरव व्यंकटराव जुनियर कॉलेज, माजी प्राचार्य सूनील देसाई, मुख्याध्यापक शिवाजी येसणे, विजय राजोपाध्ये पंडित दीनदयाळ, किशोर गिलबिले संवेदना फाउंडेशन आजरा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
धावपळीच जीवन व स्पर्धेच युग आणि अहोरात्र शैक्षणिक ज्ञानासाठी आजच्या तरुणांची चाललेली धावपळ होते पण बदलत्या युगात गरजेचा आहे अधिक ज्ञानाचा आधार म्हणून अमेझॉन वरुन “झोका कथास्तु” हा कथासंग्रह खरेदी करा.
यामध्ये महाराष्ट्रातील काही हुशार नवोदित लेखकांचा समावेश आहे. वाचणामुळे माणसाच्या बुद्धीमध्ये भर होते. पण अलीकडे “वाचनसंस्कृती बंद होत चालली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आजचा तरुन भरकटत जात आहे. म्हणुन परिसंवाद करण्यास मराठी वाचक वाचन करण्याचे विसरून जात आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून ज्ञानामध्ये अधिक भर पडण्यासाठी मैत्री दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर झोका कथास्तु पुस्तक घेण्याचे अवाहन झोका इन्फोटेमेंट आयोजक यांनी केले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी संतराम केसरकर, शशिकांत पाटील, राजेश हरेर, अनिल बांदेकर, सुरेश देशमुख, संजय भोसले, फिलीप राँड्रीक्स, ज्ञानेश्वर जाधव, सुधाकर प्रभू आदीनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन वृषाली केळकर यांनी केले आभार श्री. केसरकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.