Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या सभासद साखर वाटपास १० जुलै अखेर मुदतवाढ.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या सभासद साखर वाटपास १० जुलै अखेर मुदतवाढ.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या सभासद साखर वाटपास १० जुलै अखेर मुदतवाढ.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत सभासदांना व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आजरा तालुका संघाच्या शाखांमधून साखर वितरणाचे काम सुरू आहे.

सदर साखर वाटपाची यापूर्वी जाहीर केलेली मुदत ३० जून २०२५ अशी होती. तथापि तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे साखर उचल करण्यात शेतकरी सभासदांना अडचणी येत आहेत. याचा विचार करुन व्यवस्थापनाने साखर उचलणेची मुदत वाढवून ती १० जुलै २०२५ केली आहे. आज अखेर कारखान्याचे ६० ते ७० टक्के सभासदांनी सभासद साखर उचल केली असून उर्वरित सभासदांनी दि. १० जुलै पूर्वी आपले आधार कार्डची झेरॉक्स देवून कारखान्याचे संबंधित सेंटर आॅफीस मधून साखर कार्ड घेऊन संघाचे आपल्या शाखेतून साखर उचलून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन मुकुंद देसाई यांनी केले.


यावेळी व्हाईस चेअरमन.सुभाष देसाई, सर्व संचालक मंडळ सदस्य व कार्यकारी संचालक संभाजी सावंत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.