Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआम. सतेज पाटील यांचे कडून व्यंकटराव प्रशालेला १२ कॉम्प्युटर संच प्रदान.🛑व्यंकटरावच्या स्वराज...

आम. सतेज पाटील यांचे कडून व्यंकटराव प्रशालेला १२ कॉम्प्युटर संच प्रदान.🛑व्यंकटरावच्या स्वराज आणि विवेकची ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड.

🛑आम. सतेज पाटील यांचे कडून व्यंकटराव प्रशालेला १२ कॉम्प्युटर संच प्रदान.
🛑व्यंकटरावच्या स्वराज आणि विवेकची ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड.

💥आम. सतेज पाटील यांचे कडून व्यंकटराव प्रशालेला १२ कॉम्प्युटर संच प्रदान.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा या तालुक्याच्या ठिकाणी खेड्या-पाड्यातील, वाडी- वस्तीतील, बहुजन समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलां- मुलींनी चांगले दर्जेदार शिक्षण घ्यावे या हेतूने १९३२ साली स्थापन झालेल्या आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जयवंतराव शिंपी यांनी व्यंकटराव शिक्षण संकुलात शैक्षणिक व भौतिक सुविधा वाढवत नेत आज इयत्ता पहिली पदवीपर्यंतचे शिक्षण एकाच छताकाली आणले आहे.
( प्राथमिक, हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय)
आजच्या प्रगतशील आधुनिक जमान्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान मिळणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे.

यासाठी शाळेत आय. टी. लॅब आहे पण त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचे ज्या वेळेला आम. सतेज उर्फ बंटी पाटील यांना कळविले, लागलीच त्यांनी व्यंकटराव शिक्षण संकुलातील होतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे अध्ययावत ज्ञान मिळालेच पाहिजे या उदात्त हेतूने शाळेसाठी डेल कंपनीचे आद्यावत आय फाईव् १२ कॉम्प्युटर संच भेट स्वरूपात देऊन शिक्षणाप्रती व आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री शिंपी व अभिषेक शिंपी यांच्याप्रतीही आदर व प्रेम व्यक्त केल्याचे दिसून आले.

या कॉम्प्युटर संचांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. शिंपी यांच्या हस्ते प्रशालेत करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष एस पी कांबळे, सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, विलास पाटील, व्यंकटराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष शेळके , ज्युनियर कॅालेज व हायस्कूल चे नूतन प्राचार्य एम एम नागुर्डेकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक रणजीत देसाई, ज्युनियर कॉलेज व्यवस्थापक एम. ए. पाटील व व्यंकटराव परिवारातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

🛑व्यंकटरावच्या स्वराज आणि विवेकची ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड.

आजरा – प्रतिनिधी.

.गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेच्या कु.स्वराज प्रवीण निंबाळकर व विवेक धनाजी पाटील (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाल्यामुळे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड होवून त्यांचे पाच दिवसांच्या अभ्यास सहली करीता बेंगलोर येथे प्रयाण झाले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी , सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य आर जी कुंभार, नूतन प्राचार्य एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, वर्ग शिक्षक सौ पाटील ए डी , विषय शिक्षक श्री गुरव पी एस, श्री चौगुले व्ही ए, श्रीमती कुंभार एस के यांची प्रेरणा व प्रोत्साहन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा कोल्हापूर दक्षिण चे आम.अमल महाडीक यांच्या शुभ हस्तेही त्यांच्या या अभ्यास दौऱ्याच्या प्रयाण दरम्यान कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.