नाम. आम. यांचे ग्रामविकास मंत्री नाम. जयकुमार गोरे यांना निवेदन.- जि. प. ३ पं. स. ६ अशी रचना व्हावी. आजरा तालुक्यावर झालेला अन्याय दूर करा..
मुंबई.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील कमी झालेला जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघा बाबत जिल्हा परिषदेचे ३ आणि पंचायत समितीचे सहा असे मतदारसंघाची पूर्ण रचना व्हावी. याकरिता आज दि. २४ रोजी मंत्रालय मुंबई येथे राज्याची ग्रामविकास मंत्री नाम. जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नाम. प्रकाश आबीटकर तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांना मुंबई मंत्रालय येथे निवेदन देण्यात आले.
तसेच कमी झालेल्या मतदारसंघाबाबत न्याय व्हावा. या संदर्भाचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी आमदार शिवाजीराव पाटील व आमदार अमल महाडिक आणि तालुक्याचे नेते अशोक चराटी दशरथ अमृते, जयवंत सुतार संजय सावंत याचे उपस्थित निवेदन देण्यात आले.