Home कोंकण - ठाणे लाडक्या बहि‍णींना खुशखबर; १ लाख रुपयांपर्यंत कर्ज कसे मिळवावे पहा..🟣अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार...

लाडक्या बहि‍णींना खुशखबर; १ लाख रुपयांपर्यंत कर्ज कसे मिळवावे पहा..🟣अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करत संपवल जीवन..

Oplus_0

🟣लाडक्या बहि‍णींना खुशखबर; १ लाख रुपयांपर्यंत कर्ज कसे मिळवावे पहा..
🟣अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करत संपवल जीवन..

🟣लाडक्या बहि‍णींना खुशखबर; १ लाख रुपयांपर्यंत कर्ज कसे मिळवावे पहा..

मुंबई – प्रतिनिधी

राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असून कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या काहीशा सक्षम बनल्या असून काही महिलांना लहान-सहान उद्योगही सुरू केले आहेत. आता, मुंबईतील या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. लाडक्या बहि‍णींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहि‍णींना आता शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, आता लाडक्या बहि‍णींना 9 टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्जपुरवठा चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले. शासनाच्या 4 महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की, 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे, आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं, असं गणित प्रवीण दरेकर यांनी मांडलं.

एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं, त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते, ज्यांसमवेत झालेल्या बैठकीतून या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे, मुख्यमंत्र्‍यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी बोलताना दिली. मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल, त्यासाठी व्यवसायाच्या तपासणी केली जाईल. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वयंपूनर्विकास हाऊसिंगचं ज्या पद्धतीने केलं, तसेच हेही सध्या मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, त्यामध्ये 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत. तर, 1 लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.

🟣अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करत संपवलं आयुष्य

अकोला – प्रतिनिधी

अकोल्यामधून धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे. ते अकोल्यामधील एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. त्यांनी आपल्या राहात्या घरी आत्महत्या केली.

या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेहमी सकारात्मक विचार मांडणारे, पेशंटच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर स्वतःच इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे ही घटना आणखी धक्कादायक समजली जात आहे.

डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यामधील एका रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून याच हॉस्पिटलमध्ये कामाला होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये तणावात असलेल्या शेकडो लोकांना समुपदेशन करून तणावमुक्त केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:च आत्महत्या केली आहे. डॉ. प्रशांत जावरकर यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्येमागं नेमकं काय करण होतं? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र त्यांनी कुठल्या तरी तणावातून आपलं आयुष संपवलं असावं अशी चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.