Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरपंचायत चा अंदाधुंद कारभार –अन्याय निवारण समितीच्या हस्तक्षेपाने नगरपंचायत प्रशासन खडबडून...

आजरा नगरपंचायत चा अंदाधुंद कारभार –अन्याय निवारण समितीच्या हस्तक्षेपाने नगरपंचायत प्रशासन खडबडून झाले जागे.

आजरा नगरपंचायत चा अंदाधुंद कारभार –अन्याय निवारण समितीच्या हस्तक्षेपाने नगरपंचायत प्रशासन खडबडून झाले जागे.

आजरा.- प्रतिनिधी

आजरा नगरपंचायत चा अंदाधुंद कारभार अन्याय निवारण समितीच्या हस्तक्षेपाने नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असण्याचे उघड झाले आहे. दि. १८ रोजी अन्याय निवारण समितीने प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर अखेर नगरपंचायत प्रशासनाला जाग आली असून त्यांनी साई कॉलनीतील सुरू असलेल्या आर.सी.सी. बांधकामाची पाहणी केली. ही पाहणी दिन १९ रोजी करण्यात आली.

पाहणी दरम्यान उघडकीस आलेल्या त्रुटींमध्ये साई कॉलनीमधील गटारांना चुकीचा स्लोप देण्यात आलेला असून त्यामुळे पाण्याचा निचरा नीट होणार नाही. याशिवाय आर.सी.सी. जाळी चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आली असून त्याचा संरचनात्मक दर्जा संशयास्पद आहे. तसेच वापरण्यात आलेले पी.सी.सी. काँक्रीट निकृष्ट दर्जाचे आढळले.

विशेष म्हणजे, सदर काम कोणत्या ठेकेदाराकडून सुरू आहे हे विचारण्यात आले असता सदर ठिकाणी काम करणारा ठेकेदार व प्रत्यक्ष मंजूर ठेकेदार वेगळे असल्याचे समोर आले आहे, यामुळे प्रामाणिकतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पाहणी दरम्यान अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण, नगरपंचायतचे अभियंता श्री. बैले, प्रदीप नाईक तसेच साई कॉलनीतील स्थानिक नागरिक उपस्थित होते. आजरा नगरपंचायत प्रशासनाने आता तरी योग्य ती कारवाई करून दोषींवर कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी समितीने यावेळी पुन्हा एकदा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.