वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासदांना साखर वाटप
( रु.5000/- शेअर्स असणा-या सभासदांनाही साखर वाटप करणार.)
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत भाग भांडवल रू.15000/- व रू. 10000/- जमा असलेल्या सभासदांना साखर वाटप सुरू आहे. त्यामध्ये दि.03.06.2025 इ. रोजी झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये कारखान्याकडे शेअर्स पोटी रु.5000/- ते रू. 10000/- पर्यंत रक्कम जमा असलेल्या मंजुर सभासदांनाही प्रत्येकी 10 किलो साखर प्रति किलो रू.25/- या सवलतीच्या दरात देणेचा निर्णय घेणेत आला आहे. सदर साखर व यापुर्वी सुरू असलेली रु.10000/- व रु.15000/- ची 25 किलो व 50 किलो साखर उचलणेची मुदत दि.10.06.2025 पासुन दि.30.06.2025 अखेर ठेवणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा पुर्ण सभासद रू.15000/- चा असलेने ज्या सभासदांना शेअर्स रक्कम रु.10000/- किंवा रू.15000/- पुर्ण करावयाची आहे त्यांनी अपुरी रक्कम दि.30.06.2025 पुर्वी जमा केलेस त्यांनाही शेअर्स रक्कमेच्या प्रमाणात 25 किलो व 50 किलो साखर उचल दिली जाईल. कारखान्याच्या रु.5000/- व त्यावरील शेअर्स रक्कम भरलेल्या मंजुर सभासदांनी कारखान्याचे संबंधीत शेती सेंटर ऑफीस मधुन साखर कार्ड घेवून आपल्या तालुका संघाच्या शाखेमधुन मुदतीत साखर उचल करावी असे आवाहन चेअरमन मुकुदंराव बळीराम देसाई यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, संचालक वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक संभाजी सावंत व अधिकारी उपस्थित होते.