HomeUncategorizedपुण्यात एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना कारने उडवले.- जखमी सर्व विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू.🟥कृत्रिम...

पुण्यात एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना कारने उडवले.- जखमी सर्व विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू.🟥कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या.- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह🛑💥काळजी घ्या. – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. – ३ हजारांवर अधिक रुग्ण..

🟥पुण्यात एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना कारने उडवले.- जखमी सर्व विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू.
🟥कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या.- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
🛑💥काळजी घ्या. – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. – ३ हजारांवर अधिक रुग्ण..

🟥पुण्यात एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना कारने उडवले.- जखमी सर्व विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू.

पुणे :- प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना पुण्यातील सदाशिव पेठेत एका कारने उडविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना संध्याकाळी साडे पाच वाजता घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ ही घटना घडल्याचे समजते. अपघातात जखमी झालेले सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारे होते. या विद्यार्थ्यांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. इथे एमपीएससीचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी राज्यभरातून येतात. अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन पुण्यात दिवस-रात्र अभ्यास करतात. हे विद्यार्थी तासंतास पुण्यातील अभ्यासिकांमध्ये अभ्यास करत बसलेले असतात. पण आज अशाच काही विद्यार्थ्यांना खूप दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागलं आहे. या घटनेमुळे विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

शनिवारी सायंकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ असलेल्या नाथसाई या चहाच्या दुकानात विद्यार्थी चहा घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या टुरिस्ट गाडी हुंडाईने या १२ जणांना उडवले. दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सर्व जखमींना संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.

🟥कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या.- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

रत्नागिरी :- प्रतिनिधी

कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धीमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर श्री.सिंह यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते. श्री. सिंह म्हणाले की, मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे. यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

🛑💥काळजी घ्या. – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढतोय.- ३ हजारांवर रुग्ण आढळले.- राज्यातही कोरोना रूग्णसंख्या वाढतेय.-
साताऱ्यात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

मुंबई :- प्रतिनिधी

देशात पुन्हा एकदा हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढलं आहे. देशात आतापर्यंत ३ हजार ३९५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत या वर्षातला पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

🟥राजधानी दिल्लीत रुग्णसंख्या २९४ वर जाऊन पोहचली आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ४६७ वर पोहोचलीय. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोविड १९ चे ८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत राज्यात नोंद झालेल्या कोरोना संसर्गाची एकूण रूग्णसंख्या ६८१ झाली आहे. त्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४६७ आहे. कोरोना वेगानं पसरत असला तरी घाबरु नका, असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा सौम्य आहे. मात्र, त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहे. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेत राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयात कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या स्वत:ची काळजी स्वत: घेणे हाच उत्तम पर्याय आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितले. साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी अडीच वर्षांनंतर कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यांपैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर रहिमतपूर येथील रहिवासी असणारी मृत वृद्धा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना झाल्यानंतर अंतिम स्तरावर ती रुग्णालयात दाखल झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.