Homeकोंकण - ठाणेहरपवडे देऊळ बंद - अखेर खुले.( रासुबाई देवी देवस्थानचा वाद संपुष्टात. )

हरपवडे देऊळ बंद – अखेर खुले.( रासुबाई देवी देवस्थानचा वाद संपुष्टात. )

हरपवडे देऊळ बंद – अखेर खुले.
( रासुबाई देवी देवस्थानचा वाद संपुष्टात. )

आजरा.- प्रतिनिधी.

हरपवडे गावातील वादग्रस्थ असणारे श्री. रासुबाई मंदिर आज दि.२७/०५/२०२५ रोजी ग्रामस्थांसाठी सौ. मनीषा गुरव यांच्या हस्ते खुले करण्यात आले.

सचिव पश्चिम महाराष्ट्र समिती कोल्हापूर यांच्या दालनामध्ये सुनावणी होऊन दि.१५/०५/२०२५ रोजी सौ. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांची श्री. रासुबाई स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमितीची नियुक्ती करून श्री रासुबाई देवस्थानचा वाद संपुष्टात आणला. त्यानंतर मंदिराच्या किल्ल्या गाव कामगार पो. पाटील यांच्या ताब्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी दिल्या होत्या. त्या संदर्भात मा.सचिव| पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी दि.२३/०५/२०२५ रोजी गाव कामगार पो. पाटील यांना लेखी आदेश देऊन पुढील व्यवस्थान पहाणी साठी श्री.रासुबाई स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमितीच्या अध्यक्षा व समिती सदस्या यांच्याकडे मंदिराच्या चाव्या देणेत याव्यात. त्या प्रमाणे पो. पाटील यांनी समितीच्या अध्यक्षा सौ. गुरव यांच्याकडे चाव्या दिल्या.

त्यानंतर समितीच्या अध्यक्षा व पो. पाटील यांच्या वतीने गाभारा उघडण्यात आला. त्यावेळी समितीचे सदस्य, सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते. त्यांतर देवीची पूजा गुरव (पुजारी) व इतर गावकी करणारे गुरव यांचे वतीने देवीची विधीवत पूजा करून हरपवडे ग्रामस्थ व महिला यांच्या उपस्थितीत महा आरती करण्यात आली. यावेळी मा. सरपंच गोविंद गुरव, सरपंच सागर पाटील, डे. शिवाजी कांबळे, पो.पाटील निलोफर मुल्ला व आदिल मुल्ला यांचा सत्कार करणेत आला. व माझी सरपंच गोविंद गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाश संपकाळ यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.