🛑शेतकऱ्यांना शेतपंपाची चुकीची बिले देऊन दिशाभूल.- उप. अभियंता महा. वितरण शाखा- आजरा यांना उभाठा सेनेचे निवेदन..
🛑मुमेवाडीत १० वी १२ वी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.
💥शेतकऱ्यांना शेतपंपाची चुकीची बिले देऊन दिशाभूल.- उप. अभियंता महा. वितरण शाखा- आजरा यांना उभाठा सेनेचे निवेदन..
आजरा.- प्रतिनिधी.
शेतकऱ्यांना शेतपंपाची चुकीची बिले दिल्याबद्दल उप. अभियंता शाखा – आजरा यांना उभाठा सेनेचे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
विभागाकडून ज्या शेतकऱ्याच्या ५ HP ची मोटार आहे त्या शेतकर्याना १० HP ची बिल पाठविण्यात आलेली आहेत. त्याच बरोबर अनेक वर्ष वर्ष बंद असलेल्या शेती पंपाची सुद्धा वीज बिल आपल्या कंपनीकडून शेतकार्याना पाठविण्यात आलेली आहेत. शासनाने ७.५ HP च्या शेती पंपना वीज बिल माफ केलेले असताना देखील शेतकऱ्यांना वीज बिल पाठवून व कार्यवाही च्या नोटीस पाठवून शेतकऱ्यांची नाहक बदनामी व चेष्टा आपल्या विभाग कडून केलेली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा बिलच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करावे अन्यथा आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले. या निवेदनावर
संभाजी पाटील उपजिल्हा प्रमुख, युवराज पोवार तालुकाप्रमुख, समीर चांद उपशहरप्रमुख, शिवाजी आडाव, संजय उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, सह युवा सेना शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑मुमेवाडीत १० वी १२ वी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.
आजरा.- प्रतिनिधी.

मुमेवाडी ता. आजरा येथील ग्राम पंचायत मुमेवाडी, शाळाव्यवस्थापन समिती व श्री. भावेश्वरी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व सर्व पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मनोहर दावणे सर होते. त्यावेळी बोलताना श्री. दावणे म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनविल्याशिवाय त्यांचे शिक्षण थांबवू नये. मुलांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून दिले पाहिजे. तसेच पालकांनी मुलांना आपल्या सुरक्षा कवचातुन बाहेर काढले पाहिजे तरच मुले स्वावलंबी होतील असे बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. परीट सर यांनी केले. कार्यक्रमासाठी आनंदा नाईक,सौ. रुपाली कांबळे, सरपंच श्रीमती आनंदी परीट, ग्रा. सदस्या. सौ. सुरेखा पाटील, श्री. दास सर, अशोक कोळी, श्री. रामदास साठे, विजय गुरव, एकनाथ पाटील, रवींद्र कांबळे यांच्यासोबत मुमेवाडी गावातील सर्व विध्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन परीट सर यांनी केले. तर आभार वैभव कांबळे यांनी मानले.