Homeकोंकण - ठाणेजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण💥सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण💥सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन.🛑ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रांन्स एक्झाम 2025 मध्ये व्यंकटरावच्या सौश्रुती पुंडपळची निवड.

🛑जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण
💥सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन.
🛑ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रांन्स एक्झाम 2025 मध्ये व्यंकटरावच्या सौश्रुती पुंडपळची निवड.

🛑जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण.

अहिल्यानगर ;- प्रतिनिधी

Oplus_131072

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतरू येथील सिंगपोरा भागात झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत अहिल्यानगरमधील जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

🛑जवान संदीप गायकर हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. देशसेवेचे व्रत पत्करत त्यांनी अनेक दुर्गम भागांमध्ये कर्तव्य बजावले. मात्र, दहशतवाद्यांविरोधात झुंज देताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा (अहिल्यानगर) येथे उद्या (२३ मे) आणण्यात येणार आहे. गावात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. उद्या (२३ मे) ब्राम्हणवाडा गावात संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे. शहीद गायकर यांच्या पश्चात त्यांचे वडील पांडुरंग गायकर, आई, पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे.

💥सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ ते २६ मे या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी कळविले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी

(१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.

(२) दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.

(३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

(४) विजेच्या खांबांपासून लांब रहावे.

(५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.

(६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.

(७) धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

(८) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे.

(९) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

🟥सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

⭕१. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
⭕२. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका.
⭕३. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोंताकडून हवामनाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.
⭕४. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे,अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
⭕५. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढीलक्रमांवर संपर्क साधावा.

🔴अ.क्र. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक

⭕१) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ ७४९८०६७८३५
⭕२ ) जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८६१४ //८२७५७७६२१३ पोलीस टोल फ्री हेल्पलाईन –११२
⭕३) जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग (०२३६२)२२८९०१*
⭕४) महावितरण, सिंधुदुर्ग नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१९*
⭕५ ) दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२५६५१८*
⭕६) सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२७२०२८*
⭕७ ) वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष (०२३६६)२६२०५३
⭕८) कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष (०२३६२)२२२५२५
⭕९ ) मालवण तालुका नियंत्रण कक्ष (०२३६५)२५२०४५*
⭕१०) कणकवली तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७)२३२०२५*
⭕११) देवगड तालुका नियंत्रण कक्ष (०२३६४)२६२२०४*
⭕१२) वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७)२३७२३९

🛑(१०) हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in//

🅾️या संकेतस्थळावरून घ्या.

🔺(११) कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा.

🔺(१२) हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

🛑ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रांन्स एक्झाम 2025 मध्ये व्यंकटरावच्या सौश्रुती पुंडपळची निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रांन्स एक्झाम २०२५ चा निकाल नुकताच लागला यामध्ये आमच्या व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कु. सौश्रुती अमित पुंडपळ ही (ऑल इंडिया रँक- 1044 वा नंबर मिळवत )पात्र ठरली. या विद्यार्थिनीला व्यंकटराव प्रशालेतील सौ ए डी पाटील, पी एस गुरव व व्ही.ए चौगुले व श्रीम. एम व्ही बिल्ले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर जी कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले. वरील या यशस्वी विद्यार्थीनीचे, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.