Home कोंकण - ठाणे आजरा पोलीस ठाणेहद्दीतील मडीलगे गांवी झाले दरोडा व खुनाच्या गुन्ह्याचा 24 तासांच्या...

आजरा पोलीस ठाणेहद्दीतील मडीलगे गांवी झाले दरोडा व खुनाच्या गुन्ह्याचा 24 तासांच्या आत उलगडा.- फिर्यादीच निघाला आरोपी.

Oplus_131072

आजरा पोलीस ठाणेहद्दीतील मडीलगे गांवी झाले दरोडा व खुनाच्या गुन्ह्याचा 24 तासांच्या आत उलगडा.- फिर्यादीच निघाला आरोपी.

आजरा.- प्रतिनिधी.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व आजरा पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई
आजरा पोलीस ठाणेचे हद्दीतील मडीलगे गांधी गुरवगल्ली येथे राहणार सुशांत सुरेश गुरव वय 35 वर्षे धंदा कॅटरींग हे त्यांचे पत्नी सौ. पुजा सुशांत गुरव वय 32 वर्षे व त्यांची दोन लहान जुळी मुले सोपान व मुक्ता वय दिड वर्ष यांचेसह दिनांक 18/05/2025 रोजी घरी झोपलेले असताना रात्री 02.30 वा. चे सुमारास फिर्यादी सुशांत गुरव हे घराचे पाठीमागे लागून असलेल्या बाथरुमध्ये गेला, त्यानंतर 05 मिनीटांत त्यांना पत्नी सौ. पुजा गुरव हिचा ओरडण्याचा आवाज आला, म्हणून ते बाथरूम मधून बाहेर येवून पाठीमागील दरवाजातून घरात आले असता त्यांना घरातील स्वयंपाक खोलीत एका इसमाने त्यास पकडून खाली वाकवून हाताने मारले, तेव्हा त्यांची पत्नी सौ. पूजा ग्रव हिला 02 इसमांनी पकडून धरले होते व तीसरा इसम तीच्या हातातून पैशांची शबनम बंग ओचत होता, त्यावेळी त्याने पैशांची बॅग सोडून दे म्हणून सांगत होता. तेव्हा त्यातील एका इसमाने त्यांचे पत्नीचे डोक्यात लोखंडी रॉडने मारले व ती जखगी होवून पडली. त्यानंतर ते तीघे पैशांची शबनम बॅग घेवून समोरच्या दरवाजातून व एकजन मागील दरवाजातून पळून गेले, त्यावेळी फिर्यादी सुशांत गुरव हे मुलांना घेवून बाहेर आले व शेजारील लोकांना ओरडून उठविले, अशी वगैरे फिर्यादी सुशांत सुरेश गुरव यांनी आजरा पोलीस ठाणेस फिर्याद दिलेवरुन आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. 153/2025 बी.एन.एस. कलम 103(1), 309(3), 309(6), 311, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

घटनास्थळी श्वान पथक, आय-कार व न्यायवैद्यक तज्ञांचे पथक यांना बोलाविण्यात आले. तसेच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक. कळमकर व स्टाफ, आजरा पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक. नागेश यमगर व स्टाफ असे लागलीच घटनास्थळी दाखल झाले. नमुद गुन्ह्याचा एल.सी.बी. व आजरा पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 03 तपास पथकांचे मार्फत तपास करीत असताना फिर्यादी याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने माहिती घेत असताना सदरची घटना ही खुन व दरोडा पडला आहे असे भासवण्याचा प्रयत्न करीत होता. फिर्यादी याचा बनाव हा तपास पथकाच्या निदर्शनास आलेने तपास पथकाने फिर्यादी यांचेकडून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करुन घेत असताना त्याने दिलेला फिर्यादी जबाब व प्रात्यक्षिक यामध्ये संदिग्धता असल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादी याचेवर संशय बळावलेने घटनास्थळावरील परिस्थिती, भौतीक पुरावे, गोपनीय माहिती तसेच फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा फियांदी सुशांत सुरेश गुरव वय 35 वर्षे रा.मडिलगे ता. आजरा यानेच केल्याने गुन्ह्यातील फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे,

आरोपी सुशांत सुरेश गुरव वय 35 वर्षे ग्राने, बऱ्याच लोकांचे कडून व बँन्केकडून कर्ज घेतलेली आहेत. तो कर्जबाजारी असलेने ती परत करण्यासाठी आरोपी हा त्याची पत्नी सौ. पुजा ग्रव हिचेकडे सोन्याचे दागिणे गहाण ठेवून पैसे काढून लोकांची देणी व बॅन्केची कर्ज भागवूया तसेच आपल्याला असलेल्या सोरायसीस या आजारावर औषधोपचार करु या असे म्हणत होता. दिनांक 18/05/2025 रोजी मध्य रात्री 02.45 वा.चे सुमारास आरोपी सुशांत सुरेश गुरव वय 35 वर्षे व मयत पत्नी पुजा गुरव यां दोघांमध्ये वादावादी होवुन पत्नी सौ. पुजा गुरव हिने यापूर्वी देखील तुमच्या आजोबांच्या आजारपणावेळी पण सोने गहाण ठेवले होते. आता मी सोने देणार नाही. तुम्ही काय करायचे करा असे म्हणाल्याने आरोपी सुशांत गुरव याने रागाच्या भरात घरातच असलेल्या दगडाने व शेतात काम करण्याच्या छोट्या फावडधाने (खोप्याने) पत्नी सौ. पुजा गुरव हिचे डोकीत मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले असल्याचा व दरोडयाचा बनाव रचल्याची कबुली दिलेने सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करुन फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न करुन गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणलेला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी दिली.

सदरचा गुन्हा हा मा.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग इचलकरंजी . निकेश खाटमोड पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी . रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक . रविंद्र कळमकर, आजरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक . नागेश यमगर व स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफ पोठनि, मोरे, पोठनि, गळवे, पोलीस अंमलदार क्राइम ब्रॅच समीर कांबळे, प्रकाश पाटील, सतिश जंगम, अमित सर्जे, दिपक घोरपडे, कृष्णात पिंगळे, राजु कांबळे, विशाल चौगले, संदिप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन जाधव, सोमराज पाटील, रोहित मर्दाने, राजेश राठोड, सुहास कांबळे, सुशिल पाटील, हंबिरराव अतिग्ग्रे, अनिल जाधव व स्टाफ , संजय पाटील, सपोनि, युवराज धोंडे, कविता कदम, संदिप म्हसवेकर, साजिद शिकलगार, दयानंद बेनके, पांडुरंग येलकर, रेश्मा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे, नितीन पाटील, अमर उबाळे, विकास कांबळे, वैभव गवळी, सुर्यकांत सुतार, संजय नवलगुंदे, महांतेश पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रशांत सुतार, रामदास वाघ, प्रकाश पुजारी, विशाल आंबोळे, दिपक किल्लेदार, सुशांत सिंघन यांनी सदरचा खुनाचा गुन्हा उघडकिस आणलेला आहे, न्यायवैद्यक तज्ञांचे पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा तज्ञांचे पथक हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.