Homeकोंकण - ठाणेराज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के.- कोकण विभाग अव्वल ( तर यंदाही मुलींचीच...

राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के.- कोकण विभाग अव्वल ( तर यंदाही मुलींचीच बाजी.)🔴 विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू – 6 जणांना बोलताही येईना.

🟥राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के.- कोकण विभाग अव्वल ( तर यंदाही मुलींचीच बाजी.)
🔴 विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू – 6 जणांना बोलताही येईना.

पुणे.- प्रतिनिधी.

राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेलल्या मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे.

💥निकालाची विभागनिहाय टक्केवारी

पुणे :- 94.81 टक्के
⭕नागपूर :- 90.78 टक्के
⭕संभाजीनगर :- 92.82 टक्के
⭕मुंबई :- 95.84 टक्के
⭕कोल्हापूर :- 96.78 टक्के
⭕अमरावती :- 92.95 टक्के
⭕नाशिक :- 93.04 टक्के
⭕लातूर :- 92.77 टक्के
⭕कोकण :- 98.82 टक्के

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत 10 दिवस लवकर घेतल्या. निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख 64 हजार 120 मुले, तर सात लाख 47 हजार 471 मुली आहेत.

तसेच 19 तृतीयपंथीयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात 98.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात 90.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी सरस ठरली आहे. राज्यात 96.14 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 92.21 टक्के मुलं विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

🔴 विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू – 6 जणांना बोलताही येईना.

चंदीगड :- वृत्तसंस्था

पंजाबमधील अमृतसरच्या मजीठा भागात विषारी दारू पिल्याने 14 जणांचा म़त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 6 जण गंभीर अवस्थेत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृतसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मजीठा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली.

सोमवारी (12 मे) रात्री घडलेल्या या दूर्घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बनावट दारूमुळे झालेल्या या घटनेमध्ये वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. लोकांना काही लक्षणे असली किंवा नसली तरी त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढू नये यासाठी सर्व मदत केली जात असल्याची माहिती अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी एएनआयला सांगितले. याप्रकरणी विषारी दारू विकणाऱ्या पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे.

विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अमृतसरच्या मजीठा भागात सोमवारी रात्री घडली. सहा जण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना बोलताही येत नसल्याचं समोर आलंय. विषारी दारू विकणाऱ्या सर्व पुरवठादारांना आणि विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 5 गावांमध्ये विषारी दारूचा परिणाम दिसून आला आहे. या सर्व लोकांनी एकाच पुरवठादाराकडून आणि एकाच ठिकाणाहून दारू खरेदी केली असल्याचा संशय आहे. सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जात आहे.

अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या, ‘मजिठामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. आम्हाला काल रात्री कळले, आम्हाला 5 गावांमधून असे अहवाल मिळाले की काल दारू पिणाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. आम्ही आमच्या वैद्यकीय पथकांना तातडीने पाठवले. आमचे वैद्यकीय पथक अजूनही घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. लोकांना काही लक्षणे असली किंवा नसली तरी, आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन जात आहोत जेणेकरून आम्ही त्यांना वाचवू शकू. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार शक्य तितकी सर्व मदत करत आहे. आम्ही खात्री करत आहोत की ही मृतांची संख्या वाढू नये… आम्ही पुरवठादारांना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.