Homeकोंकण - ठाणेमुली समान असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरमालकाने केला जबरदस्तीने अत्याचार.- पोलीस ठाण्यात पोस्को...

मुली समान असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरमालकाने केला जबरदस्तीने अत्याचार.- पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल.- महिला संघटनांकडून घटनेबाबत तीव्र संताप.

🛑मुली समान असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरमालकाने केला जबरदस्तीने अत्याचार.- पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल.- महिला संघटनांकडून घटनेबाबत तीव्र संताप.

कुडाळ :- प्रतिनिधी.

शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे आई-वडील कामकाजा निमित्त बाहेर गेल्याचे संधी साधून जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या अन सदर अल्पवयीन विद्यार्थिनीस,याबाबत आई-वडिलांना सांगितल्यास त्या दोघांना अडकवणार तसेच तुला पाच लाखांना विकणार अशी धमकी देत घर मालक नराधमाला न्यायालयाने कडक शिक्षा करावी. अशी मागणी कुडाळ तालुक्यातील जनतेतून होत आहे.

कुडाळ तालुक्यातील एका चाळीत भाड्याने राहत असलेल्या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे आई-वडील मोलमजुरीच्या कामास गेलेले असताना तिच्या रहात्या भाड्याचे खोलीत अन्य कुणीही नसल्याने पाहून तिच्यासाठी वडिलांप्रमाणे असलेल्या घर मालकाने जबरदस्तीने त्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही बोलू नकोस. नाहीतर तुझ्या मम्मी-पप्पांना अडकवणार आणि तुला 5 लाखाला विकणार अशी धमकी देत एप्रिल 2024 ते 21/04/2025 या कालावधीत अत्याचार केला.याप्रकरणी कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल झालेली असून कुडाळ तालुक्यातील एकनाथ सोमा सावंत वय 41 यांचेवर बी.एन.एस. 2023 चे कलम 64 (2) (M), 65(1), 332(b), 351 (1) यासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5 (1), 6 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी कुडाळ पोलिस निरीक्षक आर.ए.मगदूम व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती आडकुर यांनी सखोल चौकशी करावी.तसेच मुली समान असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधमावर कडक कारवाई करावी. न्यायालयाकडून कडक कारवाई होण्यासाठी योग्य पध्दतीने तपास करुन पुराव्यांसह दोषारोपत्र न्यायालयात सादर करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.तसेच हा प्रकार म्हणजे कुडाळ तालुक्याची बदनामी करण्याचा असून अशा नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.भविष्यात असा प्रकार कुडाळ तालुक्यात घडू नये अशा प्रकारची शिक्षा आरोपीस न्यायालयाने द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

मुली समान असलेल्या अल्पवयीन शालेय मुलीवर जबरदस्तीने केलेल्या अत्याचाराबाबत कुडाळ तालुक्यातील महिला संघटना संतप्त झालेले असून या महिला संघटनाकडून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पोलिसांनी कसून शोध घ्यावा आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल या पद्धतीने पुरावा व तपासाचे काम कुडाळ पोलिसांकडून व्हावे अशी अपेक्षा महिला संघटनातून व्यक्त होत आहे.

दरम्यान अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी महिला आयोगाचे दरवाजे ठोठावण्याची प्रक्रिया महिला संघटनातून करण्यात येत असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.