
शेत पिकांचे ताबडतोड पंचनामे करून.- नुकसान भरपाई मिळावी. मनसेची मागणी. आजरा. प्रतिनिधी. अती पावसाने पिकाचे झालेले नुकसान व पडझड झालेल्या घरांची पंचनामे करून ताबडतोड नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आजरा मनसे यांनी आजरा तहसिल यांना दिले आहे. दिलेला निवेदनात म्हटले आहे की दि. २१,२२,२३ रोजी तीन दिवस प्रचंड अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये शेतामध्ये ओढे नदी वाहून जाऊन फार मोठे नुकसान झाले आहे तरी नुकसान भरपाई देतांना फक्त पिकाची नुकसान भरपाई न देता वाहून आलेले ओढे नदी यामधील दगड रेती बाजूला करण्यासाठी शेतीची मशागत पुन्हा सुरळीत होण्यासाठी लागणारा खर्च नुकसान भरपाई मध्ये घेण्यात यावा व सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच सदर पंचनामे अधिकारी यांनी प्रत्यक्षात शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे व लाभार्थी यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आजरा मनसे तहसीलदार कार्यालय आजरा समोर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात येतील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसे ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, परशराम बामने जनहित कक्ष ग्रामीण जिल्हाअध्यक्ष, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरिता सावंत, उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, प्रकाश कांबळे, प्रमोदिनी देसाई, तेजस्विनी देसाई, वसंत घाटगे,अरँचना वंजारी वैभव येसणे,संतोष वाघराळकर, वसंत पालकर सह मनसैनिकांच्या सह्या आहेत.
RELATED ARTICLES