करूळ घाटाचे काम युध्दपातळीवर काम सुरू
वैभववाडी :- प्रतिनिधी. २५
बऱ्याच दिवसांपासून वाहतूकीसाठी बंद असलेला करुळ घाटमार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती. मात्र याठिकाणी घाटमार्गात पडलेल्या भेगा अधिकच रुंदावत गेल्यामुळे २२ जुलै पासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद केली आहे.जिल्ह्यात पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजविला आहे. या मुसळधार पावसामुळे दोन आठवड्यापूर्वी करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा ढासळला. त्यामुळे दुरूस्तीसाठी करुळ घाट मार्ग २६ जुलै पर्यंत बंद करण्यात आला आहे.
दरम्यान करुळ घाटात रात्रंदिवस घाट दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर काम सुरू असून येत्या काही दिवसांत घाटमार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भुईबावडा घाट रस्त्यात भेगा अधिकच रुंदावल्याने कधीही याठिकाणी भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने सध्या तरी भुईबावडा घाट मार्गे वाहतूक पुर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
