पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी बेमुदत उपोषण.- ( मोरेवाडी येथील शेतकऱ्याचे तहसीलदारांना निवेदन.)
आजरा – प्रतिनिधी.
मोरेवाडी ता. आजरा येथील पाझर तलावात गंगाराम आडूळकर यांची तीन एकरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून दोन वर्षे झाली तरी अजूनही त्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. गेली दोन वर्षे हा शेतकरी जलसंधारणच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. तरी त्याला न्याय मिळालेला नाही. अनेकवेळा निवेदने दिली, गाठीभेटी घेतल्या तरी अधिकारी दाद देत नसल्याने शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. याबाबत श्री.आडूळकर यांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदना निवेदनात म्हटले आहे.
तीन वर्षांपूर्वी गंगाराम आडूळकर यांची ३ एकर १६ इतकी उसपीक असणारी जमीन पाझर तलावात गेली. गावच्या हिताचा विचार करून गंगाराम यांनी पाझर तलाव करण्यास संमती दिली. पाझर तलावाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली पाणी तुंबवल आहे. पण त्याचा मोबदला अजून मिळालेला नाही. म्हणून दि १५ मे २०२५ पासून तहसील कार्यालयाच्या दारात सहकुटुंब बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार आजरा यांना दिले आहे.