अवस्था हालेवाडी बसस्थानकाची.. जबाबदारी कोणाची.- गरजेपोटी शालेय विद्यार्थ्यांनी पुढे यावे.
आजरा.- प्रतिनिधी.
हालेवाडी ता. आजरा येथील बसस्थानका समोरील मागील वर्षात पावसापूर्वी बस स्थानक दिसत नव्हते. इतके गवत वाढले होते. बस स्थानकावर बसण्यासाठी जाण्यासाठी मार्ग नव्हता. अशी परिस्थिती असताना यावेळी मनसेचे सुधीर सुपल यांच्या पुढाकाराने तुषार उर्फ बबल्या येजरे, अभिषेक पाटील, अमर आपके, प्रशांत धोकरे, अवधूत सासुलाकर, अनिकेत पाटील सह मनसेची पदाधिकारी यांनी सदर बसस्थानक सभोवती असलेले गवत काढून बसण्यासाठी योग्य असे बस स्थानक केले होते.
सद्या कडक उन्हाळा चालू आहे.
पंधरा – वीस दिवसातच पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या या बसस्थानकावर वृक्ष पडले असून. या बस स्थानकावरील पत्रे तुटल्यास पावसामध्ये येथील प्रवासी व विद्यार्थी यांना या ठिकाणी अन्य कोणतीही जागा बसण्यासाठी नाही. एक महिन्यापूर्वी सदर वाळलेला वृक्ष पडला आहे परंतु अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा हद्दीमध्ये येणारी ग्रामपंचायत त्यांच्याकडून काढण्यात आलेली नाही.
सदर वृक्ष बाजूला करण्याचे फक्त अर्ध्या तासाचे काम असताना देखील. कोणीही या बस स्थानकावर पडलेल्या वृक्षाकडे पाहत नाहीत.
यामुळे आता या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. सामाजिक पक्षीय कार्यकर्त्यांनी सदर वृक्ष बाजूला नाही केल्यास.. शेवटी शालेय विद्यार्थी यांना पुढे यावे लागेल. याबाबतची चर्चा होते पण प्रत्यक्षात कृतीमध्ये कोणी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.
चौकट.
तशी आजरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर अनेक गावांच्या नजीक बस स्थानक आजही नाहीत. टोलनाक्याचे काम पूर्ण होऊन थोड्याच दिवसात टोल वसुली चालू होईल. तरीही काही गावांची गडहिंग्लज ला जाण्यासाठी बस स्थानक आहेत तर काहींची आजाराकडे जाण्याची बस स्थानके आहेत. परंतु आजरा व गडहिंग्लज या मार्गावर जाण्यासाठी एकाही बस स्थानकावर दोन्ही बाजूची बस स्थानके नाहीत. यामध्ये प्रामुख्याने आजरा गडहिंग्लज रोडवर मडिलगे येथे दोन्ही मार्गावर जाण्यासाठी एकही बस स्थानक नाही. यामुळे प्रवासी व शालेय विद्यार्थी यांची. रस्त्याच्या कडेला असलेल्या घराचा आसरा घ्यावा लागतो. आजरा गडहिंग्लज मार्गावर. आजरा तालुक्यातील प्रवासी बसण्याचे मोठे ठिकाण हे मडिलगे असून या ठिकाणी अद्यापही बस स्थानक न झाल्यामुळे. प्रवाशांनी उभ कुठे राहायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणचे बस स्थानक नेमकं गेलं कुठं.. ही जबाबदारी राष्ट्रीय महामार्गाची आहे की नाही. याबाबत अद्यापही विचारणा होत नाही. . मागणी इतकीच आहे. या गावातील लोकसंख्या व प्रवासी वर्ग अधिक असल्यामुळे गडहिंग्लज व आजरा या मार्गावर जाण्यासाठी बस स्थानक व्हावं. अशी मागणी शालेय विद्यार्थी, व प्रवासी यांच्याकडून होत आहे.
