आजरा – कानोली येथील महालक्ष्मी यात्रा ऊत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
कानोली ता.आजरा या गावची १३ वर्षाने झालेली महालक्ष्मी यात्रा भक्ती भावाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तालुक्यातील पुर्वभागात झालेल्या कानोली यात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. महागाव मार्गावर असणारे हे गाव आहे. येणाऱ्या पाहुणेमंडळी भाविक भक्तांचे टू व्हीलर व फोर व्हीलर यांचे व देवस्थानचे व ग्रामपंचायतचे परफेक्ट नियोजन यामुळे कोणतीही ट्रॉफीची समस्या निर्माण झाली नाही.
मंबईकर ग्रामस्थ मुलाच्या सुट्ट्या पडल्याने आपल्या वाहनाने सहकुटुंब यात्रेला सहभागी झाले. माहेरवासीनी लक्ष्मी देवीची ओठी भरण्यासाठी व माहेरच्या माणसांना भेटण्याच्या ओढीने हजर झाल्या होत्या.पै पाव्हणे मित्र परिवार याच्या भेटी गाठीने यात्रेत तुफान गर्दी झाली होती रात्री बारा एक वाजे पर्यंत जेवणावळी सुरू होत्या. यात्रा कमिटी अध्यक्ष संभाजी आपगे व संरपंच सौ. सुषमा पाटील ग्रामपंचायत सदस्य यात्रा कमिटी सदस्य मुंबई मंडळ सहकारी संस्थाचे पदाधिकारी आरोग्य विभाग पोलिस प्रशासन याच्या सहाय्याने यात्रा सुरळीत पार पडली.





