Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र सरपंच संघटनेची कार्यकारिणी जाहीर.- अध्यक्षपदी सरपंच बापू निऊगरे, महिला आघाडी सुषमा पाटील....

सरपंच संघटनेची कार्यकारिणी जाहीर.- अध्यक्षपदी सरपंच बापू निऊगरे, महिला आघाडी सुषमा पाटील. संघटित रहा… संघर्ष करा… विकास घडवा! आपलाही आणि समाजाचाही.

Oplus_131072

सरपंच संघटनेची कार्यकारिणी जाहीर.- अध्यक्षपदी सरपंच बापू निऊगरे, महिला आघाडी सुषमा पाटील. संघटित रहा… संघर्ष करा… विकास घडवा! आपलाही आणि समाजाचाही.

आजरा.- प्रतिनिधी.

संघटित रहा… संघर्ष करा… विकास घडवा! आपलाही आणि समाजाचाही. या विचारांनी प्रेरित होऊन संघटन बांधणी व भविष्यातील ध्येयधोरणे ठरणेसाठी आजरा तालुका सरपंच संघटनेची सभा दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. राजकीय कुरघोडी ना शह देत अल्पसंकुचित विचारांच्या लोकांना दूर ठेवत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या प्रामाणिक लोकांची मोट बांधत चालू वर्षासाठी आजरा तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारणी करण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला. कोणालाही जोरजबरदस्ती न करता स्वयंप्रेरणेने, संघटनेसाठी काम करू इच्छिणाऱ्या गट तट, राजकीय पक्ष , जात-धर्म याच्या पलीकडे जाऊन सर्व वर्गातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना समाविष्ट करुन नूतन कार्यकारणी गठीत करण्याचे सर्वानुमते ठरले. हे करत असताना दबावापोटी, भूलथापांना आणि खोट्या गोष्टींना बळी पडून संभ्रमावस्थेमुळे अथवा काही वैयक्तिक कारणांमुळे येऊ न शकलेल्या लोकांशी संपर्क करून त्यांनाही ही या प्रवाहात समाविष्ट करण्याचा व्यापक विचार या सभेत मांडण्यात आला.

यावेळी विद्यमान तालुकाध्यक्ष. संदीप चौगले यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मांडले, संस्थापक अध्यक्ष संभाजीराव सरदेसाई यांनी संघटनेची स्थापना, इतिहास व आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा मांडला. या संघटनेची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या मा. मोरे सर यांनी संघटना स्थापन करण्यापाठीमागील विचार, प्रेरणा व पुढे अपेक्षित असलेल्या कामाची दिशा के असावी याचा आढावा मांडला.
यावेळी संतोष बेलवाडे, सरपंच सुषमा पाटील,सविता जाधव, विलास पाटील,समीर देसाई व इतर सभासदांनी आपले मत व्यक्त केले. यापूर्वी इतर काही लोकांच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी सरपंचांना कोल्हापूर व इतर कार्यक्रमध्ये बोलवून उपस्थितिचा स्वतःच्या मोठेपणासाठी वापर करण्यात आल्याची भावना व चिड या सभेमध्ये व्यक्त करण्यात आली.

या संघटनेची स्थापना 2017 मध्ये तालुका मर्यादित करण्यात आली व काम चालू केले गेले. तालुक्यातील संघटनेच्या कामाची दखल राज्यभर घेतली गेली व व राज्यातील लोक आपल्या संघटनेच्या संपर्कात आले ज्यातून तालुका संघटना राज्यसंघटनेशी जोडली गेली होती. पण पुढील ध्येयधोरणे ठरवताना आजरा तालुका सरपंच संघटना राज्य संघटनेशी संलग्न काम करेल अथवा नाही किंवा कोणत्या संघटनेशी संलग्न राहील याची धोरण पुढील काही दिवसांत ठरवण्यात यावे अशी सर्वानुमते ठरवण्यात आले.

यावेळी सरपंच, उपसरपंच मानधन , सरपंचाच्या साठी कक्ष व इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील नव्याने निवड झालेल्या सरपंचांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यासभेसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. अमोल बांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभेची सांगता झाली.

सभेमध्ये सर्वानुमते कार्यकारणी निवडीचे अधिकार दिल्याप्रमाणे आजरा तालुका सरपंच संघटनेच्या सल्लागार समितीची मिटिंग जनता गृह तारण संस्थेमध्ये झाली व संस्थापक मा. मारुती मोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक अध्यक्ष संभाजीराव सरदेसाई, मा. अध्यक्ष संतोष बेलवाडे, मा. अध्यक्ष संदीप चौगले, सल्लागार नामदेव जाधव, सल्लागार अमोल बांबरे यांच्या उपस्थितीमध्ये आजरा तालुका सरपंच संघटनेची पुरुष कार्यकारणी आणि महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

आजरा तालुका सरपंच संघटना- पुरुष कार्यकारणी

  1. श्री. बापू भीमराव निउंगरे – मडीलगे – अध्यक्ष
  2. श्री. विलास शामराव पाटील – विटे-कार्याध्यक्ष
  3. श्री.मधुकर रामचंद्र जाधव -वाटंगी-उपाध्यक्ष
  4. श्री.महादेव संभाजी दिवेकर-भादवनवाडी-उपाध्यक्ष
    5.श्री. समीर पांडुरंग देसाई-शृंगारवाडी(उचंगी)-सरचिटणीस
    6.श्री . बयाजी भैरू मिसाळ- आवंडी- सहसचिव
    7.श्री. पांडुरंग जाणू खवरे-सुलगाव-खजिनदार
    8.श्री . रघुनाथ बाळू सावंत-जाधेवाडी- सदस्य
  5. श्री.मारुती लक्ष्मण पोवार-वेळवट्टी-सदस्य
  6. श्री.आनंदा राणकू कांबळे- गजरगाव-सदस्य
    11.श्री. प्रशांत कोटकर-हाजगोळी खु.
    -सदस्य
    12.श्री.नारायण विश्वास देसाई-बेलेवाडी हु.-सदस्य

आजरा तालुका सरपंच संघटनेची महिला कार्यकारणी

1.सौ.सुषमा सुभाष पाटील-कानोली-अध्यक्षा
2.सौ.सविता सुनील जाधव-हजगोळी बु.-कार्याध्यक्षा
3.सौ.भारती कृष्णा डेळेकर-सोहाळे-सरचिटणीस
4.सौ.कल्पना रामचंद्र डोंगरे-खानापूर-उपाध्यक्षा
5.सौ.सरिता सुभाष पाटील-एरंडोळ-उपाध्यक्षा
6.श्रीमती प्रियांका चंद्रकांत आजगेकर-होणेवाडी-सहसचिव
7.सौ.स्मिता ज्ञानदेव पाटील-होण्याळी-खजिनदार
8.सौ.कल्पना वसंत चाळके-देवर्डे-सदस्या
9.सौ. शुभंगी सदाशिव गुरव-का.कांडगाव-सदस्या
10.सौ.स्वाती विजय कोंडूसकर-चांदेवाडी-सदस्या
11.श्रीमती बनाबाई विजय शिंदे-हालेवाडी-सदस्या
12.सौ.सुनीता मारुती कांबळे-सरंबळवाडी-सदस्या
13.सौ.जयश्री धोंडिबा गिलबिले -लाकुडवाडी-सदस्या

आजरा तालुका सरपंच संघटनेची नूतन कार्यकारणी पुढील एक वर्षा साठी निर्धारित केली असून ही संघटना कोणत्याही इतर संघटनेशी संलग्न न राहता स्वतंत्रपणे काम करेल व संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील सरपंच, सदस्य व ग्रामपंचायतीच्या संदर्भातील अडचणी, मागण्या व प्रशिक्षण यासंदर्भात काम केले जाईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.