🛑उचंगी धरणाचे काम बंद करण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा..
🛑आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढी पुतळ्याला माजी मंत्री सतेज पाटील यांचे कडून अभिवादन.
🛑आजरा साखर कारखान्याचे नूतन चेअरमन मुकुंदराव देसाई यांचा माजी मंत्री सतेज पाटील वतीने सत्कार.
🛑मडिलगेत १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजावंदन.
आजरा.- प्रतिनिधी.

उचंगी धरणाचे काम बंद करण्याचा प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाने इशारा दिला आहे.
दोन मीटर उंची वाढवल्याने बुडीत होणाऱ्या क्षेत्राचे नवीन कायद्याने संपादन होऊन पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आज दि ३० रोजी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले असून ५ मे पर्यंत याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यासोबत बैठक न झाल्यास मोर्चाने जाऊन धरणाचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनामध्ये
अधीक्षक अभियंता
कोल्हापूर पाटबंधारे परिमंडल कार्यालय, कोल्हापूर त्यांच्याकडे खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये
१- उचंगी ता.आजरा जिल्हा कोल्हापूर या प्रकल्पाची उंची दोन मीटरने वाढवण्याची प्रक्रिया आपल्या कार्यालयाकडून चालू झाली असून ही उंची वाढविल्याने नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे रेखांकन केले आहे. उंची वाढवल्यानंतर बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन नवीन भूसंपादन कायद्याने करणे.
२ – भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राची ६५ % रक्कम कपात करून घेऊन, संकलन दुरुस्त करून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा लाभ देणे. वरील दोन विषयाची व कांही जुन्या प्रलंबित प्रश्नांची जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व आपल्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतीनिधीसोबत निर्णायक चर्चा न झाल्यास आम्ही मंगळावर दि ६ मे २०२५ सर्व प्रकल्पग्रस्त मोर्चाने येऊन उचंगी धरणाचे काम बंद करीत असलेबाबत.
उचंगी धरणग्रस्तांच्या प्रचंड संघर्षानंतर वरिष्ट पातळींवर निर्णायक चर्चा होऊन दोन मीटरने धरणाची उंची कमी करून प्रकल्पग्रस्तांच्या संमतीने धरणाचे काम चालू झाले. धरणाचे काम पूर्ण होऊन प्रकल्पात पाणी अडविले असले तरी अजूनही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे कांही प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्रलंबित असतानाच धरणाचे काम मूळ उंचीनुसार करण्याचे म्हणजे २ मीटर उंची वाढवून पूर्ण करण्याचे नियोजन आपल्या विभागाकडून केले जात आहे. त्याचे रेखांकन करून कोणाचे किती क्षेत्र जाते याची माहिती आपल्या विभागाने संकलित केली आहे. दोन मीटर उंची वाढवल्याने नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन न करता थेट खरेदी करून पुनर्वसनाचा हक्क मिळणार नाही अशी माहिती आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांना दिली जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम तयार झाला आहे. म्हणून आम्हाला खालील प्रश्नांची स्पष्टता येण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली व आपल्या उपस्थितीत बैठक होणे आवश्यक आहे.
दोन मीटर उंची वाढवल्यानंतर नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे नवीन भूसंपादन कायद्याने संपादन करणे, संपादन रकमेतील ६५ % रक्कम कपात करून घेऊन सर्व प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा लाभ देणे, दोन मीटर उंची वाढवल्याने पूर्वी संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे नव्याने संपादन होत असल्याने त्यांचे संकलन दुरुस्त करून पुनर्वसनाचा लाभ देणे, दोन मीटर उंची वाढविल्याने कांही घरे बुडीत क्षेत्रात येतात तर कांही घरे पाण्याच्या धोका पातळीवर येतात अशा घरांचे जी बुडितात येतात त्यांचे नवीन भूसंपादन कायद्याने संपादन करणे व जी धोक्याच्या पातळीत येतात त्यांचे खासबाब म्हणून संपादन करणे, पूर्वी संयुक्त मोजणी होऊन पंचनामा, मुल्यांकन झालेल्या पण संपादनातून वगळलेल्या घरांचे संपादन होऊन त्याची संपादन रक्कम त्यांना देणे, पूर्वी संपादित झालेल्या आणि बुडितात गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे कांही प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करणे. वरील प्रश्नांची निर्णायक चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेसोबत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसह सोमवार दि ५ पर्यंत बैठक न झाल्यास आम्ही मंगळवार दि ६ रोजी सर्व प्रकल्पग्रस्त मोर्चाने येऊन धरणाचे काम बंद करीत आहोत, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढी पुतळ्याला माजी मंत्री सतेज पाटील यांचे कडून अभिवादन.
आजरा .- प्रतिनिधी.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण व उत्सव समिती, आजरा यांच्याकडून महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा दि. २९ रोजी संपन्न झाला. या पार्श्वभुमीवर आजरा येथे माजी मंत्री सतेज पाटील यांचे कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुष्पहार घालून अभिवादन केले.
लोकसहभागातून साकारलेल्या आश्वारूढी पुतळ्याच्या लोकार्पणामुळे केवळ परिसरातील गिरणी कामगारांचेच नाही तर तमाम शिवप्रेमींच्या स्वप्नांची पुर्ती झाली आहे. यावेळी आजरा साखर कारखानाचे चेअरमन मुकुंदादा देसाई, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, सुनील शिंत्रे, संभाजीराव पाटील, युवराज पवार, अभिषेक शिंपी, गोडसाखर कारखान्याचे विद्याधर गुरुबे, युवराज बर्गे, समितीचे अध्यक्ष महादेव टोपले, किरण कांबळे, संकेत सावंत, मारुती मोरे, जितेंद्र शेलार, सुफियान खेडेकर, रवींद्र भाटले, रणजीत देसाई यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा कमिटी शिवप्रेमी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑आजरा साखर कारखान्याचे नूतन चेअरमन मुकुंदराव देसाई यांचा माजी मंत्री सतेज पाटील वतीने सत्कार.
आजरा.- प्रतिनिधी.

जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी डि पाटील यांचा आजरा येथे दौऱ्याच्या वेळी जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा या बँकेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संचालक मंडळाशी संवाद साधला. यावेळी मुकुंदराव देसाई यांची स्वर्गीय वसंतराव देसाई आजरा साखर कारखानाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, सुनील शिंत्रे, संपत देसाई, रविंद्र भाटले गोडसाखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे, रणजित देसाई विक्रम देसाई अमित सामंत युवराज बर्गे, अभिषेक शिंपी, संकेत सावंत सुफीयान खेडेकर
संचालक एस डी पाटील बँकचे सीईओ मारुती पाटील
यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते.
🛑मडिलगेत १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजावंदन.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे येथील ग्रामपंचायत वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी राहुल देसाई होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रा. सदस्य सुशांत गुरव यांनी केले.
तर ध्वजावंदन उपसरपंच पांडुरंग जाधव यांनी केले.
यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ ग्रामसेवक सुरेश जाधव ,अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभाग आशा सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक श्री सुतार यांनी आभार मानले.