Homeकोंकण - ठाणेझिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी.- मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु.🟥लाडक्या बहीणींना एप्रिलचा...

झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी.- मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु.🟥लाडक्या बहीणींना एप्रिलचा हप्ता या तारखेला मिळणार? – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती.🟥70 हजारांचे हेल्मेट असतानाही कोल्हापूरच्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू. ( आजरा – आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकीची धडक)🛑’मी राक्षसाला ठार केलं आहे,’ पोलीस अधिकारी पतीची हत्या केल्यानंतर पत्नीचा शेजारणीला व्हिडीओ कॉल..

🟥झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी.- मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु.
🟥लाडक्या बहीणींना एप्रिलचा हप्ता या तारखेला मिळणार? – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती.
🟥70 हजारांचे हेल्मेट असतानाही कोल्हापूरच्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू. ( आजरा – आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकीची धडक)
🛑’मी राक्षसाला ठार केलं आहे,’ पोलीस अधिकारी पतीची हत्या केल्यानंतर पत्नीचा शेजारणीला व्हिडीओ कॉल..

मुंबई :- प्रतिनिधी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. यापूर्वी देखील झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबई पोलीस वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 12 ऑक्टोबर 2024 ला बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा झिशान सिद्दिकी यांना धमकी आल्यानं, सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना पाठवण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांच्याकडून याबाबत मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. डी गँग चा उल्लेख करत जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांना गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे मेल येत असल्याची माहिती आहे. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिमायंडर साठी प्रत्येकी 6 तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे
.

झिशान सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचे मेल आल्याची माहिती आहे. डी गँगचा उल्लेख करत जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू अशी धमकी झिशान सिद्दिकी यांना देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या 2 दोन दिवसांपासून झिशान सिद्दिकींना धमकीचे मेल येत आहेत. या मेलमधून सिद्दिकी यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. प्रत्येकी 6 तासांनंतर आठवण करुन देण्यासाठी मेल पाठवणार असल्याचा उल्लेख आहे. सध्या वांद्रे पोलीस झिशान सिद्दिकी यांच्या घरी दाखल झाले असून त्यांच्याकडून जबाब नोंदवणं सुरु आहे. झिशान सिद्दिकी यांना यापूर्वी देखील धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी गोळीबार करण्यात आला होता. त्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाच झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे.

🟥लाडक्या बहीणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

पुणे :- प्रतिनिधी.

Oplus_0

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा होता. लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार आल्यास दरमहा 2100 रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात आले होते. यावर जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो, असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं. त्या पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात त्यांना 500 रुपये मिळतील हे योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं, असं देखील त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी समजतील. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात, त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात. शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असा दृष्टिकोन आहे. त्यामुळं हजार रुपये त्यांना नमो शेतकरी आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

Oplus_131072

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2 कोटी 33 लाख महिला होत्या. ही योजना राबवताना कुचराई होत नाही. ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 9 महिन्यांचे 13500 रुपये मिळाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च 2025 ची रक्कम 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकाचवेळी देण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतीयेच्या च्या निमित्तानं हप्ता दिला जाईल अशी माहिती आहे.

🟥70 हजारांचे हेल्मेट असतानाही दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू.- आजरा – आंबोली मार्गावर दुचाकी – चारचाकी धडकेत मृत्यू

कोल्हापूर :- प्रतिनिधी

लाखो रुपये किमतीची दुचाकी आणि 70 हजार रुपये किमतीचे अत्याधुनिक हेल्मेट असतानाही आजरा – आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कोल्हापुरातील तरुण दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर (25, रा.माळी कॉलनी टाकाळा, कोल्हापूर) या युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सिद्धेश रेडेकर याला मोटारसायकल रायडिंगची आवड होती. रविवारी सकाळी सहकारी मित्र फरहाद खान, नितांत कोराणे, अभय रेडीज (रा. कोल्हापूर) यांच्यासमवेत रायडिंग करत आंबोली येथे गेले. आंबोली घाट येथून परतत असताना देवर्डे ते माद्याळ दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणार्‍या चारचाकी वाहनाची मोटारसायकलला जोरात धडक बसली.

🟥सिद्धेश आर्किटेक्टचा विद्यार्थी.

या भीषण अपघातात सिद्धेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धेश हा आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

💥हेल्मेटचेही तुकडे..

सिद्धेशच्या अपघाती मृत्यूने मित्रांना अश्रू अनावर झाले होते. कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. अपघातात दोन्हीही वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. हेल्मेटचेही तुकडे झाले होते. येथील बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा सिद्धेश हा मुलगा. अपघातात सिद्धेशचा मृत्यू झाल्याचे समजताच रेडेकर कुटुंबीयांसह नातेवाईक तसेच सिद्धेशच्या मित्रांनी सकाळी शासकीय रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. या घटनेमुळे टाकाळा परिसरात शोककळा पसरली होती.

🛑’मी राक्षसाला ठार केलं आहे,’ पोलीस अधिकारी पतीची हत्या केल्यानंतर पत्नीचा शेजारणीला व्हिडीओ कॉल,

बेंगळुरू.- वृत्तसंस्था.

मी राक्षसाला ठार केलं आहे,’ पोलीस अधिकारी पतीची हत्या केल्यानंतर पत्नीचा शेजारणीला व्हिडीओ कॉल “मिरची पावडर टाकून ओम प्रकाश यांचे हात पाय बांधले. व एकामागोमाग अनेक वेळा चाकूने वार केले.
कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात दिसून आलं आहे की ओम प्रकाश यांचं त्यांनी पत्नी पल्लवीसह कुटुंबातील एका सदस्याला हस्तांतरित केलेल्या काही स्थावर मालमत्तेवरून वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने आधी त्यांच्यावर मिरची पावडर फेकली आणि बांधून ठेवत हत्या केली. 68 वर्षीय पोलीस आयुक्तांची हत्या करण्यासाठी ग्लास बॉटलचाही वापर करण्यात आला.
हत्या केल्यानंतर पल्लवीने आपल्या शेजाऱ्याला फोन केला आणि हत्या केल्याची कबुली दिली असं समजत आहे. मी राक्षसाला ठार केलं आहे असं तिने व्हिडीओ कॉल करुन सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश आणि पल्लवी यांच्यात रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास भांडण झालं. यानंतर पल्लवीने मिरची पावडर टाकून ओम प्रकाश यांचे हात पाय बांधले. यानंतर तिने एकामागोमाग अनेक वेळा चाकूने वार केले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवीने पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असणाऱ्या शेजारील मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून सांगितले पतीची हत्या केली असल्याचं सांगितलं. त्या महिलेने तिच्या पतीला कळवलं. पोलीस ओम प्रकाश यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी तातडीने पल्लवी आणि त्या जोडप्याच्या मुलीला ताब्यात घेतलं.पल्लवी आणि मुलगी कृती यांची 12 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत ओम प्रकाश यांच्यावर दोन चाकूंनी वार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेय याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने म्हटलं आहे की त्याची आई आणि बहीण दोघीही नैराश्याने ग्रस्त आहेत आणि त्यांनी यापूर्वी त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमक्यांनंतर, ओम प्रकाश त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. परंतु मुलीने 48 तासांपूर्वीच त्यांना परत घऱी आणलं होतं.त्याने सांगितले की तो डोमलूरमधील एका कार्यक्रमासाठी बाहेर होता. शेजाऱ्यांनी त्याला घरी बोलावलं. घरी पोहोचला तेव्हा त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. “माझी आई पल्लवी आणि माझी बहीण कृती या नैराश्याने ग्रस्त आहेत आणि माझ्या वडिलांशी वारंवार भांडत होत्या. मला असा संशय आहे की ते माझ्या वडिलांच्या हत्येत सहभागी आहेत,” असं त्याने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केलेलं नाही.

🟥मूळचे बिहारचे असलेले ओम प्रकाश यांनी भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. मार्च 2025 मध्ये ते कर्नाटकचे पोलिस महासंचालक झाले. यापूर्वी त्यांनी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.