🛑भारत नगर वसाहती मधील पायाभूत सुविधांसाठी २४ एप्रिल रोजी संघर्ष मोर्चा.- आजरा नगरपंचायत नजीक बेमुदत ठिय्या आंदोलन.- मुक्ती संघर्ष समिती.
🛑आरदाळ येथे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची हॉटेल वृंदावन या ठिकाणी सदिच्छा भेट.
🛑ग्रामीण रुग्णालय आजरा येथे डायलिसिस सेंटर स्थापन केल्याबद्दल अन्याय निवारण समितीच्या वतीने आभार पत्र.
आजरा :- प्रतिनिधी.

नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगरमध्ये गेली २० ते २२ वर्षापासून पायाभूत सुविधांचा आकाल पडला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत. तसेच इतर मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.
याबाबत आजरा नगरपंचायतला मुक्ती संघर्ष समितीने निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत नगर येथील विविध मागण्या मान्य नाही केल्यास गुरूवार दि. २४ एप्रिल रोजी “संघर्ष मोर्चा” काढून नगरपंचायत आवारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार. असलेबाबत निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत, उपाभियंता सर्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार आजरा यांना देण्यात आले. आजपर्यंत भारतनगर मधील रहिवाश्यानी आपल्या मूलभूत सुविधा पूरवण्याबाबत अनेकवेळा वेगवेगळे तक्रार अर्ज दिलेले आहेत. मात्र याची दखल घेतली गेलेली नाही.या विषयासंदर्भात आणि मागण्या संदर्भात म्हणणे आज निवेदनाद्वारे तहसीलदार आजरा, मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा व उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी आजरा यांना दिले आहे. तसेच प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी गारगोटी यांनाही निवेदन देऊन आपल्या समस्या मांडलेल्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे कि,आजरा शहरातील भारतनगर सन-१९९७ पासून वसाहत म्हणून अस्तित्वात आहे. तरी या वसाहतीला पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. नगरपंचायत झाल्यानंतर नुसती आश्वासने देऊन लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केलेली आहेत.मात्र त्यावर ठोस भूमिका घेऊन अंमलबजावणीची कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. महाराष्ट्र नगरपरिषद कायद्या नुसार खालील कलमांच्या आधारे शहरांमधील वेगवेगळ्या व पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे. त्यामुळे भारत नगर मधील लोकांच्यासाठी पायाभूत सुविधांची ठोस अंमलबजावणी करणे नगरपंचायतीची नैतिक जबाबदारी आहे.
नगरपंचायतीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा अत्यंत आवश्यक ठरल्या आहेत. या भागात काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे ज्यामुळे लोकांचे जीवन प्रतिकूल होत आहे. या संदर्भात भारत नगर मधील लोकांनी या अगोदरही निवेदने दिलेली आहेत. आता मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात प्रशासनाने ठोस गांभीर्यपूर्वक पाय उचलली पाहिजेत. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून आजरा शहरातील भारत नगर मधील वसाहतीत राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.

असे झाले नाही तर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने गुरूवार दि. २४ एप्रिल रोजी संघर्ष मोर्चा काढून नगरपंचायत आवारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत. निवेदन देताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर(सर )तालुका संघटक मजीद मुल्ला व भारत नगर मधील अब्दुलवाहिद सोनेखान, सलीम शेख(सर ), तोफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, खुदबूद्दीन तगारे, गुलाब शिकलगार, यासीन सय्यद (सर ), सलीम नाईकवडे, मुदस्सर इंचनाळकर, नईम नाईकवडे, शौकत पठाण, आसिफ मुराद, सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी, मोईन शेख, मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, पापा लतीफ, मोहम्मद नसरदी, फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी मुफीद काकतीकर व भारत नगर मधील रहिवासी व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
🛑आरदाळ येथे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची हॉटेल वृंदावन या ठिकाणी सदिच्छा भेट.
आजरा.- प्रतिनिधी.

प्राध्यापक सुभाष शेळके सर आरदाळच्या सरपंच रूपालीताई पाटील यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्र्यांनी आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी धावती भेट दिली आरदाळ बस स्टॅन्ड जवळील हॉटेल वृंदावन या ठिकाणी सुभाष शेळके सर व सरपंच रुपालीताई पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या डी एम पाटील यांनी बैठकी बाबत विनंती केली जिल्हा अधिकाऱ्या कडे लवकरच बैठक घेण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले यावेळी ग्राफ सदस्य विठ्ठल पवार ग्राप सदस्य पुंडफळ माझी उपसरपंच अमोल बांबरे धरणग्रस्त प्रतिनिधी सचिन पावले, आनंदा पावले, शंकर पुंडपळ, सदू शिवणे, अंबुताई सोनार, नंदा शेळके, यांचे सह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आभार प्रा. सुभाष शेळके सर यांनी मानले.

🛑ग्रामीण रुग्णालय आजरा येथे डायलिसिस सेंटर स्थापन केल्याबद्दल अन्याय निवारण समितीच्या वतीने आभार पत्र.
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी
ग्रामीण रुग्णालय आजरा येथे डायलिसिस सेंटर स्थापन केल्याबद्दल आभार पत्र देण्यात आले आहे. सदर पत्रामध्ये म्हटले आहे. आपण ग्रामीण रुग्णालय , आजरा येथे डायलिसिस सेंटर उभारले ही अत्यंत स्तुत्य व जनहिताची बाब आहे. या केंद्रामुळे आजरा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा वेळ, पैसा व शारीरिक त्रास वाचणार आहे.

आपल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल व लोककल्याणाच्या सेवेसाठी घेतलेल्या या उपक्रमाबद्दल अन्याय निवारण समिती , आजरा आपला मनःपूर्वक आभारी आहे. आपण सदैव जनतेच्या आरोग्य व कल्याणासाठी असेच कार्य करत राहावे, हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. आपले शतशः आभार. असे दिलेल्या पत्रात म्हटले यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.