🔥पुण्यात व्हॉल्वो बसला भरदुपारी भीषण आग.- बस जळून खाक.- प्रवाशांनी टाकल्या उड्या.
🟥सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणाबाबत.- शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पदाधिकाऱ्यानी.- जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.
पुणे :- प्रतिनिधी

पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील खेड शिवापूरजवळ अचानक बसला आग लागली, त्यात बस जळून खाक झाली.बसमधून 20 ते 25 प्रवाशी प्रवास करत होते, आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या. या व्हॉल्वो बस दुर्घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले असून रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.दरम्यान, आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे. मात्र, आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन गाडी येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली.अग्निशामक दलाची गाडी आणि ॲम्बुलन्स थोड्या उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून दुपारच्या सुमारास वाहनेही तापत आहेत. त्यामुळे, या बसला आग उन्हामुळे इंजिन गरम होऊन लागली की नेमकं कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाही.
🟥सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणाबाबत.- शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पदाधिकाऱ्यानी.- जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.
( सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी.)
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या प्रकरणासोबतच या घटनेला वेगळं वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्याही चौकशीची मागणी करत संबंधीतांनी दोन वर्षे विडिओ लपवून घेवत आता नेमक्या कुठक्या उद्देशाने प्रसारित केले याचाही तपास करण्याची मागणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब,माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, संतोष साटविलकर, दादा साईल, विनायक राणे,अरविंद करलकर,रत्नाकर जोशी आदी उपस्थित होते.