Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रप्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच रस्त्याच्या कामाचा निर्णय.आजरा तहसील कार्यलयात बैठक..🛑पुलाखालील गटारी मुळे...

प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच रस्त्याच्या कामाचा निर्णय.आजरा तहसील कार्यलयात बैठक..🛑पुलाखालील गटारी मुळे वाहतुकीची कोंडी .- उचगाव उबाठा सेनेच्या वतीने. निवेदन- आंदोलनाचा इशारा.

🛑प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच रस्त्याच्या कामाचा निर्णय.
आजरा तहसील कार्यलयात बैठक..
🛑पुलाखालील गटारी मुळे वाहतुकीची कोंडी .- उचगाव उबाठा सेनेच्या वतीने. निवेदन- आंदोलनाचा इशारा.

आजरा – प्रतिनिधी.

Oplus_131072

खेडगे ते किटवडे व्हाया आंबाडे रस्त्याचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चालू होते. शेतकऱ्यांनी याबाबत कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याखेरीज रस्त्याचे काम करु देणार नाही असे सूचित केले होते. शनिवारी १२ रोजी अंबाडे व लिंगवडी येथील शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर आज आजरा तहसील कार्यलयात बैठक झाली.
हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होत असल्याने याला संपादन नाही. त्यामुळं कांही शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होणार आहे. त्याऐवजी रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या रस्त्यामुळे पावसाळ्यातील पाट पाण्याचे मार्ग बंद होणार आहेत त्याचा सर्व्हे करून ते पूर्ववत चालू राहतील असे करून देणे. शेतकऱ्यांच्या पाईपलाईन ज्या उखडल्या जातील त्या पूर्ववत बसवून देणे याबाबत शनिवारी १९ रोजी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन स्थळ पाहणी करूनच निर्णय करावा असे ठरले. यावेळी उपअभियंता अविनाश वायचळ, शाखा अभियंता प्रशांत पाडकर याच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, विष्णू पाटील, सहदेव प्रभू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑पुलाखालील गटारी मुळे वाहतुकीची कोंडी .- उचगाव उबाठा सेनेच्या वतीने. निवेदन- आंदोलनाचा इशारा.

उचगाव.- प्रतिनिधी.

उचगांव हायवे पुलाखाली गटारी मुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.‌ तसेच हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळ पाणी योजनेच्या पाईप लाईनला धक्का लागुन गळती होवू नये याबाबत उचगाव उबाठा सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.‌ दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उचगाव पुलाखालुन जाणारा रस्ता हा हुपरी -पट्टणकोडोली, गडमुडशिंगी, मणेरमळा तसेच कर्नाटकात जात असल्याने येथे मोठया प्रमाणात वाहतुक पुलाखालुन असते सरनोबतवाडी येथील हायवेचा पुल पाडल्याने त्याबाजुची मोठया प्रमाणात वाहतुक ही या पुलाखालुन जात असते. तसेच पुलाच्याखाली गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावरती येवून मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वाहतुकीची ही कोंडी दिवसातून आठ ते दहा वेळा या कडक उन्हाळयामध्ये होते. त्यावेळी सदर ठिकाणचे फेरीवाले व पोलिस ही सतत होणारी वाहतुकीची कोंडी सोडवत असतात आपल्या खात्याने पुलाखालील गटर ही अंडरग्राऊंड करून घेतल्यास व वळणावरती असलेल्या परसट गटारीमुळे होणारी वाहतुकीची कोंडी कमी होवून तेथे कडक उन्हामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवणाऱ्या पोलिस कर्मचारी तसेच फेरीवाले यांचे होणारे हाल थांबू शकतात.
तसेच वाहतुक कोंडीमुळे कड़क उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या वाहन चालकांना ही दिलासा मिळू शकतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होवून वाहतुक सुरळीत होवु शकते. तसेच कणेरीवाडी, गो.शिरगांव, सरनोबतवाडी या रस्त्यावरती चालु असलेल्या हायवेच्या कामामुळे ज्या ठिकाणाहून गांधीनगर नळ पाणी योजनेची पाईप लाईन गेली आहे त्या पाईप लाईनला धक्का न लागता काम करावे जेणे करून आपल्या खात्याच्या चुकीमुळे जी १४ गावे ही गांधीनगर नळ पाणी योजनेवरती अवलंबुन आहेत ती गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाहीत व कडक उन्हात नागरिकांना आपल्या चुकीमुळे पाण्यासाठी वन-वन फिरावे लागु नये आपण तशा सूचना ठेकदाराला कराव्यात जेणे करून हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनला धक्का न लावता काम करावे तसेच उचगांव हायवे पुलाखालील अंडरग्राऊंड गटारी बाबत तात्काळ निर्णय घेवून वाहतुकीच्या कोंडी वरती मार्ग काढावा अशी करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महेश विष्णु पाटोळे, प्राधिकरण अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणपुलाच्या खालच्या गटारीमुळे वाहतुकीची कोंडी होऊन सर्वांनाच त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना बोलवून गटारीचे योग्य नियोजन कशा प्रकारे करता येते जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेऊ तसेच हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळ पाणी १४ गावांच्या योजनेच्या पाईपलाईनला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे, शरद माळी, कैलास जाधव,सचिन नागटिळक, बाळासाहेब नलवडे, मोहन रजपूत, किशोर कामरा, सुनील पारपाणी, दीपक फ्रेमवाला, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, संदीप शेटके, तौफिक पठाण आदी उपस्थित होते
..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.