Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमडिलगेत पुराचे पाणी नागरिकांच्या घरात..- ओढ्या शेजारी संरक्षण कठडा बाधण्याची मागणी.【नागरिक आंदोलनाच्या...

मडिलगेत पुराचे पाणी नागरिकांच्या घरात..- ओढ्या शेजारी संरक्षण कठडा बाधण्याची मागणी.【नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात.】

आजरा. प्रतिनिधी. २३

मडिलगे ता. आजरा येथील गावातील वस्तीशेजारीच ओढा असून पावसाळ्यात प्रत्येक वर्षात घरामध्ये पाणी जाते. येथील ग्रामस्थाची वेळोवेळी मागणी होते की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओढ्याचे पाणी येण्याच्या ठिकाणी संरक्षण कटडा बाधण्यात यावा. परंतु ग्रामपंचायतचे वेळ काढु धोरण हे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पुन्हा अश्वासनाने घेऊन पुढे येते. तर प्रशासन नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सुचना देत हा पाण्याच्या पुराचा प्रश्न स्थालास्तराने संपणारा नसुन पुराचे पाणी घरामध्ये येवु नये यासाठी काय कराव लागणार ते प्रयत्न केले पाहिजे पण तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. परंतु येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतला संरक्षण कठडा बाधल्याशिवाय शांत बसणार नाही. असा एकमताने निर्णय घेत आहेत. येथील काही नागरिकांनी कर्ज करुन नव्याने घरे बाधली आहेत. यामुळे ग्रामपंचायतचा महसुल वाढला आहे. पण येथील नागरिकांनी घराची पायाची उंची वाढवल्याने घरामध्ये जाण्याचे प्रमाणही थोडेसे कमी झाले आहे. तरीही पुरपरिस्थिमध्ये या पाण्याचा सामना करावा लागत आहेच. यासाठी संरक्षण कठड्याची गरज आहेच. सद्याची पाण्याची पातळी कमी आलेनंतर लागलीच या पाण्याचा बदोबस्त नाही केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे बोलले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.