🛑मडिलगेत निळ वादळ मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
🛑 गडहिंग्लज – लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे येथील निळ वादळ मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक , उपासिका आणि विशेषतः बालचमू मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी लहान मुलांसाठी व्याख्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेकांना वही पेन बक्षीस देण्यात आले. त्याच बरोबर गोवा येथे बोर्ड मध्ये प्रथम आल्याबद्दल श्रुती कांबळे हिचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची घेण्यात आली होती. अनुक्रमे तीन विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी मंडळाचे सल्लागार हिंदुराव कांबळे, अध्यक्ष अरुण कांबळे, सचिव महेंद्र कांबळे, अमोल कांबळे, अजित हिंदुराव कांबळे, रोशन रमेश कांबळे सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रेसर असणारे मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी सर्वाचे आभार मानले,
🛑 गडहिंग्लज.- लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रक्रियेला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे या विचाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले पाहिजे यासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे, पुणे यांचे “आपले भविष्य भारतीय संविधान” हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला व शिक्षकांना हे भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
गडहिंग्लज शहरातील डॉ झाकिर हुसैन उर्दू विद्यालय ,काळू मास्तर विद्यालय ,सावित्रीबाई फुले विद्यालय ,बँरिस्टर नाथ पै विद्यालय ,दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय ,छत्रपति शिवाजी विद्यालय या शाळांना संविधानाची प्रत्येकी पाच प्रति देवून आंबेडकर जंयती साजरी करण्यात आली. लकी खिदमत फाउंडेशन अध्यक्ष अमजत मिर ,इम्रान चाँद , इकबाल नंनदीकर,समीर राऊत , इरफान मुजावर,संविधान संविधान चळवळीचे संग्राम सावंत,संतोष कांबळे,दिंगबर विटेकरी, प्रकाश कांबळे,जमीर नदाफ, इरफान शेख,यासीन शेख,अफताब नदाफ , शिलेदार,मलिकजान नदाफ, तौहिद हेब्बाळे,अमजद नदाफ, तबारक अन्सारी व सर्व शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.