आजरा तालुका सहकार भारती कार्यकारणीच्या पदांच्या नियुक्त्या जाहीर.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुका सहकार भारती कार्यकारणीच्या पदांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. आजरा तालुका कार्यकारिणीची बैठक आजरा येथे १० एप्रिल रोजी पार पडली सदर बैठकीमध्ये आजरा तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रात विविध पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची नेमणूक आजरा तालुका सहकार भारती कार्यकारणी वर करण्यात आली.
या कार्यकारणीवर, श्रीपाद कुलकर्णी, रमेश कारेकर, महादेव खाडे उत्तुर, मिलिंद पुजारी, सुनील पाटील हालेवाडी, सुभाष चौगुले शिरसंगी, सुरेश आसबे होनेवाडी, श्रीधर कुलकर्णी आजरा, जोतिबा मुरकुटे आजरा, जयवंत येडूरकर पेरणैली, सौ दिपाली अमृते हाळोली, सौ काजल कुलकर्णी आजरा, यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
नूतन पदाधिकारी यांना कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ .अनिल देशपांडे यांचे हस्ते नियुक्तीची पत्रे देण्यात आली यानंतर अध्यक्षांनी सर्व सदस्यांना सहकार भारतीचे कार्य व कामकाजाची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले तसेच तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील विविध अडचणी विषयी चर्चा करण्यात आली प्रास्ताविक व स्वागत कार्यकारणीचे सचिव मिलिंद पुजारी यांनी केले व आभार कार्यकारिणीचे महामंत्री श्रीपाद वामन कुलकर्णी यांनी मानले.