आजरा सरपंच आरक्षणाबाबत सोडत संपन्न.- पहा गावनिहाय आरक्षण पहा.
आजरा.- प्रतिनिधी.

सरपंच आरक्षणाबाबत आजरा तहसील कार्यालय सभागृहात तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली सोडत संपन्न झाली. यावेळी तहसीलदार श्री माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
महाराष्ट्र ग्रामपंचायत ( सरपचं व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २- अ (१) (२) नुसार प्रस्तूत अधिसूचना राजपत्रात प्रसिध्दी झालेपासून पुढील ५ वर्षाच्या (सन २०२५ ते २०३०) कालावधीसाठी सरपंच पद आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून सदर अधिसूचनेव्दारे आजरा तालुक्यातील एकूण ७३ ग्रामपंचायतीकरीता सरपंच पदापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पदे तालुकानिहाय वाटप करणेत आले.
त्याप्रमाणे आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतसाठी खालीलप्रमाणे प्रवर्गनिहाय पदे वाटप करणेत आलेली आहेत.

वरीलप्रमाणे सरपंच पदाकरीता सन २०२५ ते २०३० करीता आरक्षण प्रवर्गनिहाय वाटप करणेत आलेले आहेत. सदर पदाचे ग्रामपंचायतनिहाय आरक्षण निश्चित करणेकरीता मंगळवार दि ०८ रोजी दुपारी ३.०० वा मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, तहसिलदार कार्यालय आजरा सभागृहामध्ये आरक्षण सोडत झाली. यावेळी आजरा तालुक्यातील आजी – माजी सरपंच, सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी मानले.
