Homeकोंकण - ठाणेपुंडलीकराव जाधव यांच्या मनसे प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण.【 कोल्हापूर जिल्ह्यात मनसेला...

पुंडलीकराव जाधव यांच्या मनसे प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण.【 कोल्हापूर जिल्ह्यात मनसेला बळकटी येणार.】

पुंडलीकराव जाधव यांच्या मनसे प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण.
【 कोल्हापूर जिल्ह्यात मनसेला बळकटी येणार.】

मुंबई. प्रतिनिधी. २२.

इचलकरंजी येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यंत्रमाग महामंडळ महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष विद्यमान भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य पुंडलीकराव भाऊ जाधव यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेमध्ये प्रवेश यावेळी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर आमदार राजू पाटील मनसे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर उपस्थित होते. श्री जाधव यांना लवकरच पक्षाची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मनसेला बळकटी येणार आहे. मनसे अध्यक्ष श्री ठाकरे यांचा दौरा व पुंडलिक भाऊ जाधव यांचा पक्ष प्रवेश यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. श्री.जाधव यांनी शिवसेनेच्या तिकिटावर इचलकरंजी लोकसभा व शिरोळ विधानसभा लढवून चांगले मताधिक्य घेतले होते. यांचे प्रवेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे पक्षात अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.